एकदा का वसुबारस हा सण आला की, सगळेच एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवतात. दिवाळी हा सण पाच दिवसांचा असला तरी तो मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. दिवाळीत रांगोळी, फटाके, नवे कपडे, फराळ, कंदील पणत्या दिवे यासगळ्या गोष्टींचा समावेश असतो. त्याशिवाय दिवाळी हा सण कोणी साजरा करत नाही.
यात आपण आपल्या नातेवाईक, भावंड, मित्रमंडळी अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना नवीन आणि सुंदर शुभेच्छा द्यायच्या असतील तर, तुम्ही सोशल मीडियाद्वारे मराठी मेसेज पाठवू शकता. चला तर जाणून वाचू सुंदर शुभेच्छा.
टॉप १० दिवाळी शुभेच्छा
घरात लक्ष्मीचा निवास
अंगणी दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास
दिवाळी अशी खास
शुभ दिपावली
जुने जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरुप होऊन
सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
समृद्धी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
भाग्याचा सूर्योदय झाला
वर्षा झाली हर्षाची
इंद्रधनुष्याचे रंग फुले
शुभेच्छा ही दिपावलीची
स्नेहाचा सुंगध दरवळला
आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत
आली दिवाळी आली..
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे!
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आनंदाचे गाणे गात
दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ,
ही दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो...
घेऊनी दिव्यांचा प्रकाश
सोनेरी माळोनी गंध मधुर
उटण्याचा करा संकल्प
सुंदर जगण्याचा गाठूनी
मुहूर्त दिवाळीच्या सणाचा
दीपावली शुभेच्छा
यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके !!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!
अशा पद्धतीने तुम्ही दिपावली सुंदर शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.