Lakshmi Pujan 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Lakshmi Pujan 2023 : लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कधी? पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते? पाहा संपूर्ण लिस्ट

Lakshmi Pujan Date : आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. यंदा हा सण १२ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

कोमल दामुद्रे

Lakshmi Pujan Shubh Muhurt 2023 :

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण. हिंदू धर्मात दिवाळीला खास महत्त्व आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणारा सण.

बाजारात सर्वत्र दिवाळीची लगबग पाहायला मिळते आहे. आकाशकंदील, रांगोळ्या, रंग, दिवे, फटाके आणि फराळ अशा रेलचेल पाहायला मिळते आहे. आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. यंदा हा सण १२ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते. या पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. दिवाळी पूजा साहित्य

दिवाळीत (Diwali) पूजा करताना चौरंग, लाल वस्त्र, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, हळदी, कुंकू, गंध, सुपारी, लवंग, अगरबत्ती, दिवा, तूप, गंगाजल, पंचामृत, फुले, फळे (Fruit), कापूर, कापूस, गहू, दुर्वा, बत्ताशे, चांदीची नाणी, कलश, नारळ, देठाची पाने आदी साहित्य असावे.

2. लक्ष्मी पूजनाची योग्य वेळ

दिवाळीचा प्रदोष काळ संध्याकाळी ०५.२९ ते ०८.०८ पर्यंत, वृषभ काळ संध्याकाळी ०५.३९ ते ०७.३५ पर्यंत आणि रात्री ११. ३९ ते १२. ३२ पर्यंत आहे. दिवाळीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ मानले जाते.

3. दिवाळीत श्रीगणेश- देवी लक्ष्मीची मूर्ती कशी असावी?

  • दिवाळीत देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची मूर्ती तुटणार नाही याची काळजी (Care) घ्यावी.

  • या काळात आपण लक्ष्मी देवीचा फोटो देखील वापरु शकतो.

  • दिवाळीच्या दिवशी दरात रांगोळी काढा, दिवे लावा आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

लिंबू सरबत की ऊसाचा रस, कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य?

SCROLL FOR NEXT