Sprouts Koshimbir Saam Tv
लाईफस्टाईल

Sprouts Koshimbir: घरच्या घरी बनवा झटपट कडधान्याची कोशिंबीर; पाहा रेसिपी

Diet Recipe : घरच्या घरी झटपट बनवता येईल अशी कडधान्याची कोशिंबीर ट्राय करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sprouts Koshimbir Recipe:

आजकाल सर्वजण आरोग्याबाबत खूप जास्त सतर्क झाले आहेत. सर्वजण निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेक लोक डाएट करतात. डाएट करताना अनेकदा काय खावे हे समजत नाही. डाएच करताना शरीराला पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते.

अनेकदा आपण सलाड, काकडी, टॉमेटो हे पदार्थ खातो. परंतु रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कडधान्याची कोंशीबीरची रेसिपी सांगणार आहोत. तुम्हीनेहमी कांदा- टॉमेटोची कोशिंबीर खाल्ली असेल. मात्र आज कडधान्याची कोशिंबीर ट्राय करा.

साहित्य

  • मटकी

  • हिरवे मूग

  • हरभरे

  • ओले खोबरे

  • मिरच्या

  • लिंबू

  • चवीनुसार मीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • साखर

कृती

सर्व कडधान्ये सम प्रमाणात घ्यावी.

ही कडधान्ये आदल्या दिवशी भिजत घालावे.

त्यानंतर मटकी, मूग, हरभरे वेगवेगळे शिजवावे.

कडधान्य थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे.

त्यानंतर त्यात ओले खोबरे, बारीक चिरलेल्या मिरच्या, लिंबू, चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकावी. आवश्यकता असल्यास साखरदेखील टाकू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT