Right Way To Drinking Water In Diabetes Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes च्या रुग्णांनो या पद्धतीने पाणी पिताय? कधीच राहाणार नाही Blood Sugar नियंत्रणात

Right Way To Drinking Water In Diabetes : पाणी पिण्याच्या योग्य पद्धतीचा आपल्या साखरेच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. मधुमेह हा आजार गंभीर स्वरुपाचा असला तरी योग्य पद्धतीने यावर मात करता येते. जाणून घेऊया मधुमेहींसाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar Level :

शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे हे सगळ्यात कठीण काम आहे. सकाळी उठल्यानंतर शरीरात साखर वाढण्याची प्रक्रिया अधिक जलद वेगाने होते. परंतु, अशावेळी आहार आणि जीवनशैलीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी बदल्यातर यावर मातही करता येते. त्यामुळे साखर चयापचय नियंत्रित करण्यास मदत होते. अशावेळी फायदेशीर ठरते पाणी. तुम्ही आहारात कोणते पदार्थ खाता यापेक्षा तुम्ही कोणत्या प्रकारे पाणी पिताय. या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाणी (Water) पिण्याच्या योग्य पद्धतीचा आपल्या साखरेच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. मधुमेह हा आजार (Disease) गंभीर स्वरुपाचा असला तरी योग्य पद्धतीने यावर मात करता येते. जाणून घेऊया मधुमेहींसाठी (Diabetes) पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

1. मधुमेहामध्ये पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे शरीरात हायड्रेशनचे काम करते. ज्यामुळे साखरेचे चयापचय वेगवान होतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डिहायड्रेशन होते. ज्यामुळे साखर लघवीद्वारे बाहेर पडण्यास अडचण येते. त्यासाठी मधुमेहींनी शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

2. मधुमेहांनी दिवसाला किती पाणी प्यावे?

मधुमेहाच्या रुग्णांनी द्रव पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. महिलांसाठी दररोज सुमारे १.६ लिटर तर पुरुषांनी २ लिटर पाणी प्यावे. याशिवाय इतर खाण्यापिण्याच्या पदार्थांचे सेवन देखील योग्य प्रमाणात करायला हवे.

3. गरम की, थंड मधुमेहींनी कोणते पाणी प्यावे?

मधुमेहाच्या रुग्णांनी गरम पाणी प्यावे कारण ते रक्तवाहिन्यामध्ये पसरते. ज्यामुळे इन्सुलिनचे शोषण वाढू शकते. साखर नियंत्रणात राहून पोट साफ राहाते तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. याशिवाय थंड आणि गरम पाणी एकत्र न पिण्याचा प्रयत्न करा. रात्री झोपण्याच्या २ तासाआधी पाणी प्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT