Diabetes Health  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes मुळे होऊ शकतो Kidney वर परिणाम, वेळीच घ्या काळजी; अन्यथा...

How To Care Kidney : रक्तातील साखरेची पातळी कमी झाली नाही, तर त्याचा तुमच्या शरीराच्या इतर अवयवांसह तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Diabetes Symptoms :

जगभरात मधुमेहाच्या आजाराने अनेक लोक त्रस्त आहे. या आजाराचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. सर्वच वयोगटातील लोकांना मधुमेहाचा आजार आहे. मधुमेहामुळे जवळपास शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कमी झाली नाही, तर त्याचा तुमच्या शरीराच्या इतर अवयवांसह तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. मधुमेहाचा (Diabetes) आजार अधिक काळ राहिल्याने नेफ्रोपॅथीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी (Care) घ्यायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मधुमेह नेफ्रोपॅथी म्हणजे काय?

मधुमेह नेफ्रोपॅथीला किडनी रोग असेही म्हणतात. अनियंत्रित मधुमेहामुळे होणाऱ्या या आजारात किडनीचे नेफ्रॉन खराब होऊ लागतात. ज्यामुळे किडनी विषारी द्रव्ये व्यवस्थित फिल्टर करु शकत नाही. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा धोका कमी होऊ शकतो.

2. लक्षणे कोणती?

  • चेहरा, हात आणि पाय सुजणे

  • धाप लागणे

  • भूक न लागणे

  • मळमळ वाटणे

  • उलट्या

  • उच्च रक्तदाब

  • थकवा

  • त्वचा कोरडी पडते

3. मधुमेह कसा रोखायचा?

  • मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी रक्तदाबावर उपचार करुन तो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा

  • आहारात सोडियम, प्रथिने आणि पोटॅशियमचे प्रमाण नियंत्रित करा. याचे प्रमाण अतिरिक्त झाल्यास किडनीवर दाब पडतो, ज्यामुळे नेफ्रॉनचे नुकसान होऊ शकते.

  • जर तुम्हाला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

SCROLL FOR NEXT