Dhanteras 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2022 : धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करताय ? त्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या

या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. लोक आज सोन्यात गुंतवणूक करतात.

कोमल दामुद्रे

Dhanteras 2022 : दिवाळी हा दिव्यांचा सण. दिवाळीच्या सणात धनत्रयोदशीला अधिक महत्त्व असते. 'धन' म्हणजे पैसा, तर 'तेरस' म्हणजे कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. विशेषतः, भारतात दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो.

आज धनत्रयोदशीचा सण आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. लोक आज सोन्यात गुंतवणूक करतात. असे मानले जाते की धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्याने सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी सोन्याव्यतिरिक्त चांदी खरेदी (Shopping) करणे देखील शुभ मानले जाते. परंपरेमुळे या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. त्याच वेळी, सणासुदीच्या काळात यावर्षी भारतीयांनी जोरदार खरेदी केली आहे. (Latest Marathi News)

या कारणास्तव, कंपन्या आणि ज्वेलर्स देखील संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ऑफर देत आहे. जर तुम्हीही या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

1. हॉलमार्क केलेले दागिने निवडा

तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रत्येक दागिन्यांमध्ये हॉलमार्क असणे आवश्यक आहे. BIS लोगो, हॉलमार्क केंद्राचे नाव/लोगो, निर्मात्याचा लोगो असणे आवश्यक आहे.

2. मेकिंग चार्जेस तपासा

मेकिंग चार्जेस जीएसटीपूर्वी दागिन्यांच्या संपूर्ण किमतीमध्ये जोडले जातात, ज्याची ज्वेलरी स्टोअरमध्ये वाटाघाटी करता येते. लक्षात ठेवा की मेकिंग चार्जेस डिझाइन आणि बाजार दरांवर आधारित आहेत. अधिक मेकिंग चार्जेस भरल्याने दागिन्यांची किंमत वाढते आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात.

3. विश्वसनीय विक्रेते शोधा

सोने खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याची सात्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे आणि विश्वासू विक्रेत्यांकडूनच सोने खरेदी करा. ज्वेलर्समध्ये उपलब्ध असलेल्या मशीनवर तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

4. परत खरेदी करा

कोणतेही दागिने खरेदी करण्यापूर्वी नेहमी बाय बॅक पॉलिसी तपासा. दागिन्यांच्या पुनर्विक्रीसाठी वेगवेगळ्या ज्वेलर्सची वेगवेगळी धोरणे असतात. काही ज्वेलर्स काही टक्के कपात करतात. तर, काही सध्याची किंमत विचारात घेतात. कधीही घाई करू नका आणि नेहमी बायबॅक धोरण तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT