Dhanteras 2022  Saam Tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2022 : यंदाची धनतेरस आहे खास, तुमच्या प्रियजनांना पाठवा याप्रकारे शुभेच्छा !

धनतेरस 2022 साठी प्रियजनांसोबत शुभेच्छा, Status, कोट्स या पध्दतीने शेअर करण्यासाठी तुमच्यासाठी काही शुभेच्छा आणि संदेश

कोमल दामुद्रे

Dhanteras 2022 : दिवाळी हा सणांचा राजा. या सणात सर्वत्र रोषणाई, आतेषबाजी, फराळ व धामधूम आपल्याला पाहायला मिळते. यंदा धनतेरस ही २२ ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशी हा संपत्ती आणि समृद्धीचा शुभ सण (Festival) मानला जातो.

'धन' म्हणजे पैसा, तर 'तेरस' म्हणजे कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. विशेषतः, भारतात दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो. (Latest Marathi News)

यंदाच्या धनत्रयोदशीच्या पूजेची वेळ 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 ते रात्री 8.17 दरम्यान असेल.

धनतेरस 2022 साठी प्रियजनांसोबत शुभेच्छा, Status, कोट्स या पध्दतीने शेअर करण्यासाठी तुमच्यासाठी काही शुभेच्छा आणि संदेश येथे आहेत:

Happy Dhanteras 2022

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

Happy Dhanteras 2022

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

घरी लक्ष्मीचा वास असो आप्तेष्टांची सदैव साथ असो... ही धनत्रयोदशी आपणांस खास असो... धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि संपन्नता लाभावी...

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,

सर्वांना धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT