Daily योग: एकपाद उत्तानासन Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग: एकपाद उत्तानासन

एकपाद उत्तानासनात पाठीवर झोपून केवळ पाय उचलले जाते. ओटीपोट आणि मांड्याच्या स्नायूंसाठी हे अतिशय उत्तम आसन आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकपाद उत्तानासनात पाठीवर झोपून केवळ पाय उचलले जाते. ओटीपोट आणि मांड्याच्या स्नायूंसाठी हे अतिशय उत्तम आसन आहे. पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे आकाशाकडे तोंड करून झोपलेली अवस्था. हे आसन करताना पाठीवर झोपून एक पाय ६० ते ९० अंशांपर्यंत वर केला जातो. म्हणूनच या आसनाला एकपाद उत्तानासन असं म्हणतात. Daily Yoga Ekpad Uttanasana

एकपाद उत्तानासन कसे करावे?

चटईवर किंवा योग मॅटवर पाठीवर झोपावं. दोन्ही पाय Legs सरळ आणि ताठ ठेवावेत. दोन्ही हात शरीरालगत ठेवावेत. आता उजवा पाय ६० अंश इतका वर आणावा. यावेळी पाय ताठ ठेवावेत. काही सेकंद थांबून पाय हळूहळू खाली आणावा. हे आसन करताना मान उचलू नये. हीच प्रक्रिया नंतर डाव्या पायाने करावी.

एकपाद उत्तानासनचे फायदे कोणते?

- मांड्या आणि ओटीपोटाचा खालचा भाग बळकट होण्यास मदत होते.

- ओटीपोटातील सर्व अवयवांचे कार्य सुधारते

- कमरेखालील सांधे मोकळे होतात.

- पाठीच्या कण्याचा खालचा भाग मजबूत होण्यास मदत मिळते.

- पचनक्रिया करणाऱ्या अवयवांचे कार्य सुधारते.

Edited By-Shiwani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT