Relationship Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : हनीमूनसाठी गेलेल्या जोडप्यांनी चुकूनही 'या' चुका करू नये; आयुष्यभर होईल पश्चाताप

Ruchika Jadhav

हनीमून हा क्षण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि सुंदर क्षण मानला जातो. या दिवशी पार्टनर पहिल्यांदाच पती-पत्नी म्हणून एकमेकांना भेटणार असतात. एकमेकांसह कॉलिटी टाइम स्पेंड करणार असतात. या दिवसांमध्ये काही न चुका करणे दोघांसाठी देखील महत्वाचे असते. मात्र काही ना काही कारणावरून चुका होतात आणि या गोष्टी त्या व्यक्तीच्या मनात आयुष्यभर राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हनीमूनसाठी गेलेल्या जोडप्याने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहिती सांगणार आहोत.

भांडणे वाद यावर चर्चा नको

लग्न म्हटल्यावर भरपूर पाहुणे येतात. त्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रितीरिवाज असतात. त्यामुळे यावरून नवरी आणि नवरदेव अशा दोन्ही माणसांमध्ये काही ना काही कारणावरून छोटे मोठे वाद होतात. त्यामुळे हनीमुनला गेल्यावर अशा गोष्टी इग्नोर करा. तसेच यावर तुमच्या पार्टनरशी कोणत्याही प्रकारच्या गप्पा करू नका.

माफी मागा

काही चुका झाल्या आणि नात्यात वाद झाला तर चुकूनही वाद वाढवू नका. काही झाले तरी थेट तुमच्या पार्टनरची माफी मागा. तुमची चूक नसतानाही तुम्ही माफी मागितलेली पाहून पार्टनरच्या मनातील तुमच्या विषयीचे प्रेम आणखी जास्त वाढेल. तसेच पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल जास्त आदर निर्माण होईल.

हॉटेल रूममध्ये जास्तीत वेळ घालवा

नवीन लग्न झाल्यावर तुम्ही पार्टनरसोबत जेव्हा हनीमूनसाठी जाता तेव्हा तुमचा जास्तीत जास्त वेळ हॉटेल रुममध्ये घालवा. कारण नंतर पुन्हा आयुष्यात कामाचा व्याप वाढतो. त्यामुळे कपलला एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे हनीमूनला आल्यावर आपली सुट्टी मस्त एन्जॉय करा. ऑफिसबद्दल जास्त विचार करू नका.

चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी स्विकारा

पार्टनरवर प्रेम करताना त्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. एकत्र वेळ घालवत असताना आपल्याला पार्टनरच्या आनेक चांगल्या आणि वाईट सवयी लक्षात येतात. काही गोष्टी अगदी शुल्लक असतात. त्यामुळे त्यावर वाद करू नका. तसेच पार्टनरला तुमच्यासाठी बदलण्यास सांगू नका. पार्टनर जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : राज्यात दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल - शरद पवार

Suryakumar Yadav: सूर्याने इतिहास रचला! T20I क्रिकेटमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Gajkesari Rajyog 2024: 19 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; मिळणार भरपूर पैसा अन् समृद्धी!

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी उद्यानातील ही प्रमुख आकर्षणे तुम्हाला माहिती आहेत का ?

Ulhasnagar News : चोरीला गेलेले ४ लाख २५ हजार रुपयांचे मोबाईल सापडले; सीईआयआर पोर्टलवरून शोध

SCROLL FOR NEXT