Corona Variant JN.1  Saam Tv
लाईफस्टाईल

Corona Variant JN.1 : न्यू इयर सेलिब्रेशनचं प्लानिंग करताय? गर्दीत जाण्याआधी कोरोनाच्या Jn.1 धोका ओळखा

Corona Variant JN.1 Disease : जगभरातील अनेक देशांमध्ये COVID -19 च्या JN.1 प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

कोमल दामुद्रे

New Year Celebration :

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा भारतात एन्ट्री केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच लवकरत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरु होईल.

जगभरातील अनेक देशांमध्ये COVID -19 च्या JN.1 प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत राज्यांना अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातही JN.1 चा संसर्ग पसरण्याचा धोका सांगण्यात आला आहे. जर तुम्ही देखील नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याचा प्लान करताय तर काळजी कशी घ्याल? त्याचा धोका किती आहे? हे जाणून घेऊया.

कोरोनाचा (Corona) हा नवा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्रिटन, आइसलँड, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड आणि चीन या देशांमध्ये याचा शिरकाव झालेला पाहायला मिळत आहे.

1. कोरोनाच्या Jn.1 ची लक्षणे कोणती?

या आजारामध्ये ताप, थकवा, सर्दी, नाक गळणे, घसा खवखवणे, डोकेदुखी (Headache), खोकला आणि पोटाचे विकार यांसारख्या समस्या दिसून येत आहे.

2. नवीन वर्षाच्या पार्टीनिमित्त गर्दीत जाताना काय काळजी घ्याल?

  • तज्ज्ञांनी सांगितले की, जर कुणालाही सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

  • तसेच शक्यतो गर्दीत जाणे टाळा. गर्दीत जात असाल तर मास्कचा वापर करा.

  • सोशल डिस्टसिंग ठेवा. घराबाहेर पडताना सॅनिटायझरचा वापर करा.

  • आहारात (Food) प्रोटीन आणि व्हिटॅमिन पुरेसा प्रमाणात खा.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स आणि स्टेरॉईड औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT