Child Care Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Child Care Tips : मुलांची उंची वाढवायची आहे? 'या' गोष्टी खाऊ घाला, लवकरच परिणाम दिसून येईल

बाजारात मिळणाऱ्या काही पदार्थांचे सेवन केल्यास उंची वाढण्यास मदत होईल असे अनेक जण सांगतात.

कोमल दामुद्रे

Child Care Tips : हल्ली मुलांची उंची वाढवण्यासाठी पालक बरेच प्रयत्न करत असतात. काही वेळा ही गोष्ट आनुवंशिक असते तर काही वेळी पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या गोष्टी घडतात. बाजारात मिळणाऱ्या काही पदार्थांचे सेवन केल्यास उंची वाढण्यास मदत होईल असे अनेक जण सांगतात परंतु, योग्य आहाराचे सेवन न केल्यास उंती वाढत नाही.

मुलांच्या उंचीमुळे पालकांना अनेकदा काळजी वाटते. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची उंची चांगली, उंच असावी असे वाटते. अनेक वेळा पालकांना उंचीची इतकी काळजी वाटते की ते मुलांना विविध प्रकारची औषधे देऊ लागतात. जे मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होते.

त्यामुळे पालकांनीही ही गोष्ट समजून घ्यायला हवी की, मुलांना औषधांऐवजी अशा गोष्टी द्याव्यात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडत नाही आणि उंची वाढवण्याचे कामही होते. उंची वाढवण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हिरव्या भाज्या. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने मुलांना भरपूर पोषण मिळते. यामुळे आरोग्यासोबतच उंची वाढण्यासही मदत होते.चला तर जाणून घेऊया त्याबद्दल (increase the height of children)

1. हिरव्या पालेभाज्या खाणे –

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने उंची वाढण्यास मदत होते. त्यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे यांसारखे गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने मुलांची पचनक्रिया चांगली राहते. यासोबतच रक्ताची कमतरता आणि अशक्तपणाही दूर होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्येही कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. कॅल्शियमच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. त्यामुळे त्यांच्या सेवनाने मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

2. अंडी -

अंड्यांचे सेवन लहान मुलांसाठीही खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या उंचीबद्दल काळजी वाटत असेल तर दररोज सकाळी तुमच्या बाळाला अंडी खायला द्या. अंड्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडांची मजबुती आणि लांबी वाढण्यास मदत होते. इतकेच नाही तर अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाणही असते, जे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते.

3. सोयाबीन –

सोयाबीनमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे मुलांनी हे सेवन केलेच पाहिजे. याच्या सेवनाने शरीराला ताकद मिळते आणि मुलांच्या वाढीसाठीही ते खूप फायदेशीर असते.

4. दूध -

दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असते हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मुलांसाठी दुधाचे सेवन खूप फायदेशीर आहे. दुधाचे सेवन केल्याने मुलांची वाढ चांगली होते. तसेच दूध (Milk) खूप पौष्टिक आहे.

5. चिकन -

चिकनचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) आहे. चिकनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ताकदीसाठी चिकन खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT