Relationship Saam TV
लाईफस्टाईल

Relationship : मुलींनो, पर्टनरवर तुमचं जीवापाड प्रेम आहे? मग आजच 'या' तीन प्रश्नांची उत्तरे त्याला विचारा, नातं आणखी घट्ट होईल

Relationship Tips : तुम्ही तुमच्या पार्टनरचा किती आदर करता या सर्वांवर नातं अणखी घट्ट होतं. अनेक मुली आपल्या प्रियकरावर प्रेम करताना मनातील बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेम ही एक अशी भावना आहे जी आपल्याला आनंदी आणि सुखी ठेवते. आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करणारे अनेक कपल्स आहेत. प्रेमाचं नातं हे फक्त प्रेमावर नाही तर विश्वासावर आणि आदर करण्यावर टिकलेलं असतं. तुम्ही तुमच्या पार्टनरचा किती आदर करता या सर्वांवर नातं अणखी घट्ट होतं. अनेक मुली आपल्या प्रियकरावर प्रेम करताना मनातील बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतात.

आपल्या पार्टनरला जास्त जाणून घेण्यासाठी, त्याच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही प्रश्न शोधले आहेत. हे प्रश्न प्रत्येक मुलीने आपल्या पार्टनरला विचारले पाहिजेत. त्यामुळे नात्यातील विश्वास आणखी घट्ट होतो. तसेच कितीही अडचणी आल्या तरी तुमचं नातं कायम बहरलेलं राहतं.

पहिला प्रश्न

तुझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे का ज्यासाठी करिअर व्यतीरिक्त तू त्यासाठी धडपड करत आहेस. तुला त्या गोष्टींची आवड आहे. तुझं पॅशन काय आहे? मात्र तू आजवर मला ती गोष्ट सांगितलेली नाही असं काही आहे का? तू मला ती गोष्ट सांगितल्यास आपण दोघं मिळून ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

जेव्हा पार्टनरला तुम्ही असा प्रश्न विचाराल तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचं प्रेम आणखी वाढेल. तसेच नातं आणखी जास्त घट्ट होईल.

दूसरा प्रश्न

पार्टनरबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी त्याला त्याच्या पास्ट बद्दल विचारा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही पास्ट घडलेला असतो. त्यामुळे ती व्यक्ती आज तुमच्या समोर वेगळ्या स्वभावात उभी असते. तुम्ही असे का वागता? तुमच्या पास्टमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत का? ज्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत पोहचले आहात? आता पास्टमध्ये एखादा वाइट प्रसंग किंवा प्रेमप्रकरण सुद्धा असू शकते. हा प्रश्न विचारल्याने तुमचं नातं आणखी पारदर्शक होईल. पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल.

तिसरा प्रश्न

आजवर तुला माझ्या कोणत्या गोष्टी आवडल्या नाहीत किंवा पटल्या नाहीत, मात्र प्रेमामुळे तू मला त्या सांगितलेल्या नाहीत. त्या गोष्टी आज मला सांग मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल. हा प्रश्न विचारताच पार्टनर तुमच्यावर जास्त प्रेम करत असेल तर तो तुम्हाला काहीच सांगणार नाही. अशा प्रश्नांमुळे तुमचं नातं किती घट्ट आहे हे तुम्हाला समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

SCROLL FOR NEXT