ChatGP Banned  Saam Tv
लाईफस्टाईल

ChatGPT Banned : शिक्षण विभागाने घातली ChatGPT वापरावर बंदी, मुलांची वाढली चिंता !

सध्या चर्चेत असलेले ChatGPT चा वापर सर्वात जास्त वाढलेला दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ChatGP Banned : सध्या चर्चेत असलेले ChatGPT चा वापर सर्वात जास्त वाढलेला दिसून येत आहे. GPT म्हणजे (Generative Pre-trained Transformer)जनरल नॉलेजच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे गुगल आहे. पण आता केवळ प्रश्नच नव्हे तर आपल्यासाठी कथा, कविता, पटकथा, निबंध असं सगळं चुटकीसरशी देणारं तंत्रज्ञान वापरासाठी तयार आहे.

काहींनी असे सांगितले की, गुगल लवकरच बंद होईल तर काही लोक याला मानवांसाठी धोका असल्याचे सांगत आहेत. आगामी काळात नागरिकांच्या नोकऱ्यांसाठी ChatGPT धोकादायक ठरणार असल्याची चर्चा आहे. मात्र, लोक त्याचा गैरवापर करू लागले आहेत.

तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी क्षणार्धात हे चॅटबॉट देतं आहे म्हणून विद्यार्थी आता होमवर्क करण्यासाठी या चॅटबॉटचा वापर करत आहेत. त्यामुळेच न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनईटीच्या रिपोर्टनुसार, शाळेचे प्रवक्ते जेना लाय यांनी दावा केला आहे की या चॅटबॉटमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे याच्या वापराला बंदी घालावी लागत आहे.

चॅट जीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी कोणतेही कष्ट न घेता गृहपाठ कॉपी करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल.

त्यामुळे न्यूयॉर्क हे ChatGPT ला ब्लॉक करणारं पहिलं शहर ठरलं आहे. येत्या काही दिवसात इतर ठिकाणीही याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. न्यूयॉर्कमध्ये सध्या विद्यार्थी आणि शालेय स्टाफ फक्त त्याच डिव्हाइसवर ChatGPT वापरू शकतात जे शाळेच्या सिस्टमशी लिंक नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Maharashtra News Live Update: लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास

कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, साडीवर दिसतील भारी

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

SCROLL FOR NEXT