Chandra Grahan 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2024 : १०० वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण! या ५ राशी ठरतील लकी, मिळतील नोकरीच्या नव्या संधी

Chandra Grahan 2024 Date : मार्च महिन्यात होळीतले पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे. पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला २५ मार्चला चंद्रग्रहण दिसणार आहे.

कोमल दामुद्रे

Chandra Grahan 2024 Rashifal :

मार्च महिन्यात होळीतले पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे. पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला २५ मार्चला चंद्रग्रहण दिसणार आहे.

यंदा होळीच्या (Holi) दिवशी १०० वर्षानंतर चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. ग्रहणाच्या छायेत यावेळी होळी साजरी केली जाणार आहे. हे ग्रहण भारतात (India) दिसणार नाही. पण त्याचा काही राशींवर परिणाम होणार आहे. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त भाद्र नक्षत्राच्या समाप्तीनंतर असेल.

२४ मार्च रोजी १०.२८ नंतर ते २५ मार्च रोजी रात्री ११.३१ पर्यंत पौर्णिमेचा योगायोग आहे. त्यामुळे २५ मार्च रोजी शास्त्रानुसार रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. २५ मार्चला हे चंद्रग्रहण सकाळी १०.४१ वाजता सुरु होईल तर दुपारी ३.०१ मिनिटांनी संपेल. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास ३६ मिनिटे असणार आहे. हे ग्रहण काही राशींसाठी लकी ठरणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मेष

हे चंद्रग्रहण मेष राशींच्या लोकांसाठी अधिक शुभ ठरेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रयत्न केल्याने यश मिळेल. तुमचे वैयक्तिक संबंध सुधारतील. जीवनसाथीसोबतचे (Partner) संबंध सुधारतील.

2. वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सावध राहावे लागेल. कामात दुप्पट फायदा होण्याची संधी आहे. नोकरीत प्रगती होईल.

3. सिंह

सिंह राशीच्या लोकांना आनंद मिळेल. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरु शकते. व्यापारात संमिश्र परिणाम मिळतील. कामाचे कौतुक होईल. मुलांची काळजी वाटेल. वादांपासून दूर राहा. नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी कराल.

4. धनु

धनु राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळेल. कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरीत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. प्रमोशन होईल.

5. मकर

मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करु शकता. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. नात्यात दूरावा येण्याची शक्यता आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT