Chanakya Niti For Life Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Life : घरामध्ये घडणाऱ्या या संकेतांना दुर्लक्ष करू नका, अन्यथा...

Sings Of Life Problems : चाणक्य म्हणतात की जर आपण घरात किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटनांकडे दुर्लक्ष केले तर आपल्यावर वाईट संकट येते.

Shraddha Thik

Chanakya Niti Describe in Marathi:

आचार्य चाणक्य एक उत्कृष्ट विद्वान आणि शिक्षक होते. त्यांनी आपल्या नीतीशास्त्रात बरेच काही लिहिले आहे. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या सर्वांना जीवनातील आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करते. आजही लोक त्यांची धोरणे अवलंबतात. चाणक्यांनी त्यांच्या एका धोरणात म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा ती अगोदरच जाणवते.

चाणक्य म्हणतात की जर आपण घरात (Home) किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटनांकडे दुर्लक्ष केले तर आपल्यावर वाईट संकट येते. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा संकेतांनाबद्दल सांगितले आहे जे घरावर येणाऱ्या आर्थिक संकटाकडे निर्देश करतात. घरात येऊ घातलेल्या आर्थिक संकटाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लक्षणांबद्दल जाणून घ्या.

'तुळशीचे रोप सुकणे, घरात भांडणं होणे, काच वारंवार फुटणे, पूजेचा अभाव आणि ज्येष्ठांचा अनादर' - आचार्य चाणक्य.

तुळशीचे रोप सुकणे

चाणक्य सांगतात की जर तुमच्या अंगणात किंवा घरातील तुळशीचे रोप सुकायला लागले तर याचा अर्थ तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय, हे भविष्यातील त्रासाचे लक्षण (Symptoms) देखील असू शकते.

घरी भांडणं होणे

आचार्य चाणक्यांनुसार, जर तुमच्या घरात दररोज घरातील सदस्यांशी भांडण होत असेल तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार नाही. अशा वेळी तुमच्या घराकत आर्थिक स्थितीवर वाईट (Bad) परिणाम होऊ शकतो.

तुटलेली काच

ज्या घरात काचा वारंवार तुटत असतील, त्या घरातील व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT