लाईफस्टाईल

Chanakya Niti On Personality Development : चाणक्य सांगतात, पर्सनालिटी डेवलपमेंट करताना या 5 चुका करु नका

How To Develop Yourself : आपण इतरांसमोर स्वत:ला कसे मांडतो यावरुन आपले व्यक्तिमत्त्व ठरते.

कोमल दामुद्रे

Personality Development : प्रत्येकाला असे वाटते की आपली पर्सनालिटी ही अगदी साधी पण नीटनेटकी असायला हवी. आपण इतरांसमोर स्वत:ला कसे मांडतो यावरुन आपले व्यक्तिमत्त्व ठरते. व्यक्तिमत्व अधिक चांगले केले तर आपले करिअर चांगले होते.

चाणक्य (Chanakya) म्हणतात की, माणूस व्यक्तिमत्त्व सुधारणात त्याच त्याच चुका सतत करतो. काही चुका या नकळत घडतात तर काही या जाणूनबुजून केल्या जातात. त्याचा आपल्या जीवनावर व व्यक्तीमत्वावर नकारात्मक (Negative) परिणाम होतो. या चुका सवयीचा भाग बनल्या तर लोकांमध्ये दुरावाही निर्माण होतो. तुम्हालाही तुमच्या व्यक्तिमत्त्वाला हानी पोहोचवायची नसेल, तर आजपासूनच या चुकांपासून दूर राहण्यास सुरुवात करा. शिका.

1. उपेक्षा

व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आपल्या स्वत:ची काळजी घेणे अधिक गरजेचे असते. यामध्ये आपण शारीरिक व मानसिक दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर आपण स्वत: कडे दुर्लक्ष करायला लागलो तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व यश मिळत नाही.

2. तुलना नको.

माणसांने यशस्वी (Success) व आनंदी असणे चांगले आहे. परंतु, यासाठी इतरांची बरोबरी केल्यास करिअर व आयुष्य दोघांमध्ये जड होऊ शकते. इतरांबद्दल मत्सर करण्याची किंवा स्वतःची तुलना करण्याची सवय आपल्याला विचलित करते. कामावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे मनात नकारात्मकता निर्माण होऊ शकते.

3. कठोर व्हा

कोणताही निर्णय घेताना स्वत:बद्दल कठोर होणे अधिक चांगले नसते. यामुळे इतरांना आपण अधिक चिडचिडे स्वभावाचे वाटू शकतो. त्यामुळे आपल्या मनात देखील शंका निर्माण होऊ शकते. चुका करणे सामान्य आहे आणि त्यास गुन्ह्यासारखे हाताळू नका.

4. चुकांमधून शिका

चुका करणे ही सामान्य गोष्ट असली तरी त्यांच्याकडून न शिकणे ही मोठ्या चुकीपेक्षा कमी नाही. वय काहीही असो आपण नेहमी शिकण्याची प्रवृत्ती अंगीकारली पाहिजे. चुका कमी करा आणि त्यांच्याकडून शिकण्याची सवय लावा.

5. दुर्लक्ष करा

वैयक्तिक गोष्टी आणि विकासामध्ये नातेसंबंध देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अनेकवेळा आपण नात्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतो. यामुळे एकाकीपणा येतो आणि काही वेळा रिकामेपणा जाणवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT