Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success : चाणक्यांनी सांगितला, अपयशाकडून यशाकडे जाण्याचा मार्ग...

How To Become Successful In Life : जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे.

कोमल दामुद्रे

Success Tips By Chanakya Niti : आपल्या आयुष्याचे यश हे आपल्या चांगल्या वाईट कर्मावर अवलंबून असते. सुखी आणि समृध्द जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. असं म्हणतात की संयमाचं फळ गोड असतं, पण कृतीचं फळ त्याहूनही गोड असतं.

तुम्हालाही आयुष्यात वारंवार अपयश (failure) येत असेल तर चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही यश मिळवू शकता. जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या काही गोष्टींची काळजी (care) घ्यावी लागेल.

1. लक्ष

जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे. कारण यामुळे तुमचा मार्ग अधिक सोपा होईल. आपल्या कामावर म्हणजेच ध्येयावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

2. परिश्रम

कठोर परिश्रमाशिवाय यशस्वी होणे म्हणजे स्वप्न पाहण्यासारखे आहे. त्यामुळे जर तुम्हाला यश तुमच्या जवळ हवे असेत तर कठोर परिश्रमाची परीक्षा पार पाडावी लागेल. आचार्य चाणक्य म्हणतात की कठोर परिश्रम केल्याशिवाय माणसाला काहीही साध्य होणार नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि सततच्या मेहनतीचे फळ नेहमीच चांगले असते.

3. संधी

अनेक वेळा (Time) आपल्या समोर काही गोष्टी घडतात आणि त्यामागचे कारण काय आहे हे आपल्याला समजत नाही. विशेषत: जेव्हा तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तेव्हा या मार्गात येणाऱ्या संकटांचे संधीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला काय फायदा होईल हे देखील समजून घ्या. तुमच्या कठीण वेळाचे संधींमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही प्रत्येक आव्हानाला सहज सामोरे जाऊ शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT