Chanakya Niti On Women Respects  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women Respects : या स्त्रियांचा नेहमी आदर करा, लक्ष्मी सदैव राहिल पाठिशी

Women Respects : प्राचीन भारतात आणि चाणक्याच्या काळात स्त्रियांचा खूप आदर केला जात असे.

Shraddha Thik

Chanakya Niti :

प्राचीन भारतात आणि चाणक्याच्या काळात स्त्रियांचा खूप आदर केला जात असे. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. चाणक्यांचा असा विश्वास होता की, ज्या राज्यात महिलांना समान दर्जा आणि सन्मान दिला जातो ते राज्य खूप प्रगती करते. तसेच या 5 महिलांचा आदर (Respect) करणाऱ्या कुटुंबावर किंवा व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आई

जी व्यक्ती नेहमी आपल्या आईचा आदर करते आणि त्यांची काळजी (Care) घेते, तर समजून घ्या की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावर सदैव राहील आणि तो आनंदी आणि शांत जीवन जगेल. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईची निस्वार्थीपणे सेवा करावी. स्वर्ग फक्त आईच्या चरणी आहे. मांग यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारचे संकट दूर होतात.

पत्नीची आई

पत्नीच्या आईचा दर्जा म्हणजेच सासूचा दर्जा देखील आईच्या बरोबरीचा असतो. त्यामुळे त्यांचा आदर केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. सासू-सासऱ्यांना आदराने वागवल्याने कुटुंबात जिव्हाळा कायम राहते आणि पती-पत्नीमधील नाते दृढ होते.

गुरूंची पत्नी

गुरू किंवा शिक्षकाची पत्नी देखील आईसारखी असते. गुरूंना जितका आदर दिला जातो, तितकाच आदर गुरूंनाही दिला पाहिजे.

राजाची पत्नी

चाणक्यांच्या मते, राजाची पत्नी देखील आईसारखी असते कारण राजा आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे पालनपोषण करतो आणि त्यांचे रक्षण देखील करतो. त्याचप्रमाणे राजाच्या पत्नीलाही आपल्या आई-वडिलांसारखा मान-सन्मान देतो, तेवढाच मान-सन्मान दिला पाहिजे.

मित्राची पत्नी

चाणक्यांच्या मते, मित्राच्या पत्नीबद्दल शुद्ध भावना असणे आणि आईप्रमाणे तिचा आदर करणे महत्वाचे आहे. यामुळे विश्वास, प्रामाणिकपणा आणि आपुलकी वाढते आणि देवी देवतांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT