Chanakya Niti On Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship : सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने या 4 मार्गांचा अवलंब करावा...

Relationship Of Husband-Wife : जर तुम्हालाही सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे शब्द अवश्य पाळा.

Shraddha Thik

Chanakya Niti :

चाणक्य म्हणजेच कौटिल्य हे भारतीय इतिहासातील एक महान तत्त्वज्ञ, सल्लागार आणि शिक्षक आहेत. आचार्य चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार पती-पत्नी एकमेकांसाठी पूरक आहेत. नात्यतला एकहीजण डगमगला तर कुटुंबाचे विघटन होऊ लागते. घरात भांडणं सुरू होतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच्या मधुर नात्यावर कुटुंबातील सुख-शांती अवलंबून असते, ज्या घरात पती-पत्नीचा परस्पर प्रेम वाढत नाही, त्या घरात (Home) लक्ष्मी वास करत नाही असे म्हणतात. अशा वेळी पती-पत्नीने या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या खास गोष्टी.

एकमेकांचा आदर करा

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीने एकमेकांचे मित्र बनून राहावे. शिवाय, प्रेमाबरोबरच आदरही असेल तेच नाते सुंदर असते. त्यामुळे नेहमी एकमेकांचा आदर करा. एकमेकांच्या सर्व गरजा समजून घ्या. असे झाल्यास पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होते.

अहंकारी होऊ नका

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नी ही गाडीची दोन चाके आहेत. दोघांनी मिळून पुढे जायला हवे. एक तुटला तर दुसरा एकटा कुटुंबाचा गाडा ओढू शकत नाही. कोणतेही काम पूर्ण करायचे असेल तर पती-पत्नीने स्पर्धक म्हणून नाही तर एक संघ म्हणून काम (Work) केले पाहिजे. कोणत्याही गोष्टीबाबत एकमेकांचा अहंकार कधीही दाखवू नये.

धीर धरा

जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी वैवाहिक जीवन (Life) हवे असेल तर पती-पत्नी दोघांनीही यासाठी संयम राखला पाहिजे. जीवनात परिस्थिती कशीही असली तरी पती-पत्नी दोघेही एकमेकांना धीर देऊनच पुढे जाऊ शकतात. प्रतिकूल परिस्थितीतही संयम न गमावणारे पती-पत्नीच आपले जीवन पुढे नेऊ शकतात.

तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतर कोणाशीही शेअर करू नका

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रात सांगतात की पती-पत्नीमध्ये काही रहस्य असावे. जे पती-पत्नीमधील गोष्टी स्वतःपुरते मर्यादित ठेवतात ते नेहमीच आनंदी असतात. दोघांनीही आपल्या वैयक्तिक बाबी तिसर्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घ्यावी, अन्यथा पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT