Chanakya Niti About Parenting Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Parenting : मुलांमध्ये लीडरशीप क्वालिटी विकसित करायची आहे? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

Parenting Tips : पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मुले ही चांगला लीडर बनू शकतो.

कोमल दामुद्रे

Tips to Build Leadership Qualities In kids :

मुलं मोठी होऊ लागली की, प्रत्येक पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागते. त्याच्या वागण्या-बोलण्यापासून ते अभ्यासापर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आपल्या मुलांनेही हुशार असावे, अभ्यासात नेहमी पुढे राहाव असं प्रत्येक पालकाला वाटत असते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, बहुतेक पालकांची तक्रार असते की, मुलं सक्षम असूनही त्यांच्या लीडरशीपचे गुण नसतात. परंतु, पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे मुलं ही चांगला लीडर बनू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. इतरांशी तुलना नको

अनेक पालक (Parents) आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करतात. ज्यामुळे त्यांचा अपमान केल्यासारखे वाटते. असे केल्याने त्यांच्या मनात नकारात्मकता वाढते. त्यासाठी आपले मुलं इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे. याकडे लक्ष द्या.

2. प्रोत्साहन द्या

चांगला लीडर होण्यासाठी पालकांनी मुलांना नेहमी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला हवा. तसेच त्यांना नवीन काहीतरी करण्याची सवय लावा.

3. रागावर (Anger) नियंत्रण ठेवायला शिकवा

मुलांना नेहमी शांत राहायला शिकवा. मन शांत असेल तर कोणताही निर्णय अचुक पद्धतीने घेता येतो. तसेच भविष्यात अनेक नवीन मार्ग खुले होतात.

4. संधी द्या

मुलांना नवीन काही तरी करण्याची संधी द्या. त्यांना ट्रिप (Trip) किंवा शिबीर यांसारख्या ठिकाणी पाठवा. त्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करा. त्यामुळे त्यांच्या असणारे कौशल्य गुण कळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT