Chanakya Niti On Money Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Money : पैशांच्या मागे कधीही धावू नका, आयुष्यात या गोष्टी देखील महत्त्वाच्या

Money And Satisfaction : आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये बरेच काही लिहिले आहे. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा आणि विचारांचा विचार केला तर व्यक्तीला आयुष्यात नक्कीच यश मिळू शकते.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये बरेच काही लिहिले आहे. त्यांनी दिलेले प्रत्येक धोरण माणसाला जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देते. जरी त्यांची धोरणे तुम्हाला थोडी कठोर वाटत असली तरी हा कठोरपणा जीवनाचे सत्य सांगतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा आणि विचारांचा विचार केला तर व्यक्तीला आयुष्यात नक्कीच यश मिळू शकते. अशा स्थितीत आज आपण आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्रात असलेल्या श्लोकांमधील एका श्लोकाचे विश्लेषण करूयात.

आजच्या चिंतनात आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी सुख आणि शांतीबद्दल सांगितले आहे. वास्तविक, चाणक्यनी म्हणतात की खरी सुख आणि शांती पैशांच्या (Money) मागे धावण्यात नाही तर हे काम करण्यातच सापडते. जाणून घेऊया

श्लोक

सन्तोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तिरेव च।

न च तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावाताम्॥

अर्थ -

तृप्तीच्या अमृताने तृप्त झालेल्या लोकांना जे सुख आणि शांती मिळते, ती पैशाच्या मागे इकडे तिकडे धावणार्‍यां लोकांना कधीही मिळत नाही.

आचार्य चाणक्यांच्या या विधानानुसार, आजच्या काळात लोक पैशाच्या मागे इतके धावतात की ते मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यांनी आपले कुटुंबही सोडले आहे. या सवयीमुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त होते. याचे कारण म्हणजे ते पैसे कमवण्याचे इतके वेडे होतात की ते त्यांच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात तोच माणूस पुढे जातो आणि यशस्वी होतो ज्याच्याकडे समाधान असते. जर कोणी समाधानी असेल तर तो प्रत्येक गोष्टीच्या मागे धावणार नाही, उलट तो त्याच्या सभोवतालच्या गोष्टी समजून घेईल आणि त्याच्या गरजा पूर्ण करेल. म्हणूनच चाणक्य म्हणतात की ज्याच्याकडे आयुष्य जगण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत आणि तो समाधानी आहे तो पैशाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीपेक्षा खूप आनंदी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT