Chanakya Niti On Good Leader Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Good Leader: हे ५ गुण असलेली व्यक्ती बनते चांगला लिडर, तुम्ही देखील यात आहात का?

Leadership Qualities : आपण चांगले लिडर आहात का? हे कसे कळेल? त्यासाठी कोणते गुण आपल्यात असायला हवे हे जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Qualities Of Good Leader: आपल्याला जीवनात अशा अनेक परिस्थितींचा सामना करावा लागतो जेव्हा आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. अशा परिस्थितीत आपण खंबीर आणि दृढनिश्चयी लिडर या नात्याने आव्हानाला सामोरे जावे आणि आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, काही लोक आपल्या गुणांनी सर्वांची मने जिंकतात. त्यांना समाजात सन्मान तर आहेच पण चांगले लिडर म्हणूनही ओळखले जाते. चांगला लिडर बनण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसेच आपण चांगले लिडर आहात का? हे कसे कळेल? त्यासाठी कोणते गुण आपल्यात असायला हवे हे जाणून घेऊया

1. चुकांमधून शिका

गुणांच्या जोरावरच माणूस महान आणि आदरणीय बनतो. चाणक्य (Chanakya) म्हणतात की, जे आपल्या चुकांमधून पहिल्यांदा शिकतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. चूक का झाली, ती कशी घडली हे ते शोधून काढतात आणि भविष्यात ती पुन्हा होऊ नये यासाठी मार्ग काढतात. अशी व्यक्ती आपल्या चुकांबद्दल काळजीपूर्वक विचार करते आणि इतरांच्या चुकांपासून शिकण्यास घाबरत नाही.

2. ध्येय गाठा

योग्य निर्णय घेणे प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी आपले ध्येय (Success) गाठतो, पण जे घाबरत नाही तेच शिखरावर पोहोचतात. अशक्य गोष्टी शक्य करण्याची क्षमता काही लोकांमध्ये असते आणि असे लोक लहान वयातच चांगले लिडर बनतात.

3. चांगले सहकारी ओळखा

चांगले सहकारी हे आपल्या ध्येयासाठी महत्त्वाचे असतात. लोकांनी त्यांच्या कामाच्या (Work) परिणामांची जबाबदारी घेणे आवश्यक असते. आपल्या चांगल्या कामगिरीतून आपल्याला प्रोत्साहन आणि मोठी जबाबदारी मिळते. चांगला टीम लिडर संपूर्ण कंपनीचे आयुष्य घडवते.

4. सहज उपलब्ध व्हा

आजच्या कॉर्पोरेट जगतात ही एक सामान्य तक्रार आहे की एकमेकांचे कुणीही ऐकत नाही. ते फक्त वरच्या पदाच्या लोकांचे ऐकतात. चांगल्या लिडरने कर्मचाऱ्यांच्या आणि आपल्या ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे.

5. मित्रांना सोबत घेऊन चला

कर्म माणसाचे भविष्य ठरवते. जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक नसाल आणि निष्काळजीपणा दाखवला तर उद्या तुमची जागा कोणीतरी घेईल. एक चांगला लिडर त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ त्याच्या ग्रुपवर अवलंबून नसतो, तर त्याच्या सहकाऱ्यांसोबत एक ग्रुप म्हणून काम करतो. आत्मविश्वास असलेला लिडर त्याच्या संघाला कधीही निराश होऊ देत नाही. तो आपल्या संघाच्या चांगल्या निकालांची जितकी प्रशंसा करतो तितका तो वाईट निकालासाठी संघाला दोष देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT