Chanakya Niti On Behaviour  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Behaviour : नीतीशास्त्रानुसार खोटारडेपणा करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गात स्थान नाही, वाचा सविस्तर

Human Bad Behaviour : आचार्य चाणक्य यांना ज्ञानाचे भांडार म्हटले जाते कारण त्यांना संपूर्ण वेद आणि पुराणांचे ज्ञान होते.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांना ज्ञानाचे भांडार म्हटले जाते कारण त्यांना संपूर्ण वेद आणि पुराणांचे ज्ञान होते. काही लोकांच्या मते, त्याच्या अत्यंत कुशाग्र बुद्धीमुळे त्यांना चाणक्य असे नाव पडले. त्यांनी सुचवलेली धोरणे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.

चाणक्यांनुसार (Chanakya) प्रत्येक व्यक्तीचा जन्म (Born) कोणत्या ना कोणत्या उद्देशाने झालेला आहे. नीतीशास्त्रात श्लोकांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, कधीही कोणत्याही चुकीचे साक्षीदार बनू नका, अन्यथा तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागू शकते.

याशिवाय चुकीच्या लोकांचे समर्थन करणाऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो, असेही सांगण्यात आले आहे.

चुकीचे 'साक्षीदार' होऊ नका

माणसाने कधीही कोणत्याही गैरकृत्याचा किंवा फसवणुकीचा (Fraud) साक्षीदार बनू नये, अन्यथा त्याला नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी मौन बाळगणे उत्तम मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने पैशाच्या लालसेपोटी चुकीच्या व्यक्तीचे समर्थन केले तर तो कधीही सुखी होत नाही. याशिवाय, जर तुम्ही एखाद्या चुकीचे साक्षीदार झालात तर तुम्हालाही तितकेच दोषी वाटते.

जो 'खोटी साक्ष' देतो तो नरकात जातो

चाणक्य नीतीनुसार, खोटी साक्ष देऊन गुन्हेगाराला वाचवणारे थेट नरकात जातात. सुटका करणारा हा गुन्हेगाराइतकाच दोषी मानला जातो. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांकडे देवही पाठ फिरवतो. खोटी साक्ष देणारे नेहमी नरकात जातात, अशा दुष्टांना स्वर्गात जागा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT