Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : या सवयींमुळे माणूस हळूहळू गरीब होतो, आजच सोडून द्या

Chanakya Niti About Personality : जे लोक अस्वच्छ राहतात आणि स्वच्छ कपडे घालत नाहीत, असे लोक नेहमी गरिबीचे जीवन जगतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chanakya Niti About Money : चाणक्य नीती हे आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला एक धोरणात्मक ग्रंथ आहे. हे नीतीशास्त्र विविध विषयांवरील उपदेशाबरोबरच योग्य मार्गदर्शनही करते. आचार्य चाणक्यांची नीती वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन प्रदान करते. या निती शास्त्रामध्ये अनेक महत्त्वाची तत्त्वे आणि धोरणे आहेत जी व्यक्तीला यशाची दिशा देतात.

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये व्यक्तीच्या अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे माणूस हळूहळू गरीब होतो. म्हणूनच या वाईट सवयी (Bad Habits) सोडल्या पाहिजेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वाईट सवयी...

अस्वच्छ राहणारे लोक

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक अस्वच्छ राहतात आणि स्वच्छ कपडे (Cloths) घालत नाहीत किंवा आपल्या आजूबाजूला गलिच्छ वातावरण ठेवत नाहीत, असे लोक नेहमी गरिबीचे जीवन जगतात. म्हणूनच या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत.

कडवट बोलणारे लोक

चाणक्य म्हणतात की जे खूप कर्कश किंवा कडवट बोलतात. त्यांच्यावरही माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. म्हणूनच कडू बोलण्याची सवय ताबडतोब सोडली पाहिजे आणि नेहमी गोड बोलले पाहिजे. कडवट बोलल्याने माणसाचे नाते बिघडते आणि तो गरीबही होतो.

सूर्यास्तानंतर झोपणे

चाणक्यानुसार, जे लोक संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपतात (Sleep) ते नेहमी गरीब राहतात. यावेळी जे झोपतात त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच आशीर्वाद देत नाही. म्हणूनच सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही झोपू नये.

आळस

चाणक्य नीती म्हणते की आळस ही एक वाईट सवय आहे, जी माणसाला कामात यशस्वी होऊ देत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आळस सोडा.

अयोग्य खर्च

अयोग्य खर्च माणसाला गरीब बनवू शकतो. उत्पन्नानुसार खर्चावर अंकुश ठेवलात तरच यश मिळेल. त्यामुळे तुमच्या खर्चाचे नियोजन करा, तुमच्या गरजा ओळखा आणि जपून खर्च करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT