Chanakya Niti On Laziness  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Laziness : आयुष्यात आळशीपणा अंगीकारला तर या दोन गोष्टी येऊ शकतात धोक्यात; जाणून घ्या

Laziness In Life : आचार्य चाणक्य आजही त्यांच्या धोरणांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या धोरणांचा अवलंब केल्यास दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून वाचू शकतो.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य आजही त्यांच्या धोरणांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या धोरणांचा अवलंब केल्यास दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून वाचू शकतो. चाणक्यांची धोरणे यशासाठी रामबाण उपाय आहेत.

जर कोणी ही धोरणे आणि कल्पना जीवनात अमलात आणल्या, तर भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी तो तयार होऊ शकतो. कारण आचार्य चाणक्यांच्या या धोरणांमध्येच यशस्वी (Successful) जीवनाचे रहस्य दडलेले आहे.

आचार्य चाणक्य यांनी अनेक धोरणे आणि कल्पना व्यक्त केले आहेत. आज आपण यापैकी एका कल्पनेचा विचार करूयात. आजची कल्पना आळशी व्यक्तीवर आधारित आहे.

"आळशी माणसाला वर्तमान किंवा भविष्य नसते." आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्यांनी या विधानात आळशी व्यक्तीचा उल्लेख केला आहे. या विधानात चाणक्य (Chanakya) यांनी म्हटले आहे की, आळशी व्यक्तीला वर्तमान किंवा भविष्य नसते. अशी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. खरे तर आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

जर एखादी व्यक्ती आळशी (Lazy) असेल तर तो त्याचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्याला ना आपल्या आयुष्याची किंमत कळते ना कोणते काम. त्याच्या दृष्टीने दोन्ही गोष्टींना महत्त्व नाही. कारण तो आळशीपणाच्या आहारी गेला आहे.

आजचे काम बाकी असताना लोक ते काम दुसऱ्या दिवशी पुढे ढकलत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशा व्यक्तीच्या दृष्टीने वेळेला महत्त्व नसते. ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात वेळेचे महत्त्व कळत नाही, त्याचे वर्तमान धोक्यात येते. त्याच वेळी तो आपले भविष्य पणाला लावतो.

तुमच्यात थोडा आळस असेल तर लगेच सोडून द्या. असे केल्याने तुम्ही केवळ तुमचा आजचं सुधारू शकत नाही तर तुमचे भविष्यही उज्वल करू शकता. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की आळशी व्यक्तीला वर्तमान किंवा भविष्य नसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT