Chanakya Niti On Home Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Home : घर घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा 'ड्रीम होम' बनेल डोकेदुखी

Shraddha Thik

Chanakya Niti :

सुखी जीवनासाठी चांगले घर असणे खूप गरजेचे आहे. पण प्रश्न असा असतो की की घर बांधायचे कुठे किंवा कोणत्या ठिकाणी विकत घ्यायचे जेणेकरून जीवनाचा आनंद टिकून राहील आणि दुप्पट होईल.

आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आपण आपल्या मोठ्या स्वपनावर खर्च करतो ते म्हणजे घर (Home). अशा स्थितीत घर वाईट ठिकाणी असेल तर सुख प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळेच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान असलेल्या चाणक्यांनी नीतीशास्त्रात सांगितले आहे की, आपले हे घराचे स्वप्न साकारण्यासाठी व्यक्तीने कोणत्या ठिकाणी बांधले पाहिजे. चला तर जाणून घेऊया...

श्लोक

धनिकः श्रोतियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः ।

पंच यत्र न विद्यन्ते तत्र दिवसं न वसेत् ।।

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी घर बांधताना किंवा खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, शेजारी श्रीमंत असतील अशा ठिकाणी घर बांधावे किंवा खरेदी करावे. कारण ज्या ठिकाणी श्रीमंत व्यक्ती राहतात त्या ठिकाणची व्यवसायाची परिस्थिती सकारात्मक (Positive) असते. अशा स्थितीत रोजगाराची शक्यता असेल तर अडचण येण्याची शक्यता नाही.

शिकलेला शेजारीही आनंदी जीवन देतो. आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमान लोकांचा शेजारी असणे आनंददायी आहे. कारण त्यांचे आचरण मूर्खोंपेक्षा खूप चांगले असते आणि तुमच्या मुलांचे संगोपनही व्यवस्थित होते.

सरकारची चांगली व्यवस्था असलेल्या ठिकाणी घर असणे चांगले असते. हे ठिकाण असे असावे की तुम्हाला सरकारी व्यवस्थेत सहज प्रवेश मिळेल आणि गरज भासल्यास सुरक्षेसाठी तुम्ही तेथे त्वरित पोहोचू शकता.

आजच्या काळात पाण्याची समस्या (Problem) खूप गंभीर बनली आहे, पण चाणक्यांनी त्याच वेळी सांगितले होते की, घर अशा ठिकाणी असले पाहिजे जिथे पाण्याची व्यवस्था चांगली असेल, म्हणजेच पाण्याची सहज उपलब्धता असावी.

घर घेताना हेही ध्यानात ठेवावे की ती जागा हॉस्पिटलच्या जवळ असावी. चाणक्यांच्या मते घर अशा ठिकाणी असले पाहिजे, जिथे आजारी पडल्यास त्वरित आरोग्य सेवा मिळू शकेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT