Chanakya Niti On Self Respect Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Self Respect : स्त्री असो वा पुरुष, कोणीही येऊन स्वाभिमान दुखावणार नाही अशी ठेवा वागणूक

Self Respect : चाणक्य नीती हे ज्ञानाचे भांडार आहे. आचार्यांनी जीवनातील प्रत्येक उद्दिष्ट पूर्णपणे समजवून सांगितले आहेत.

Shraddha Thik

Chanakya Niti Motivational Quotes :

चाणक्य नीती हे ज्ञानाचे भांडार आहे. आचार्यांनी जीवनातील प्रत्येक उद्दिष्ट पूर्णपणे समजवून सांगितले आहेत. त्यांच्या या धोरणांमुळे अनेकांचे जीवन बदलले. चाणक्य म्हणतात की, माणसाच्या कृती हाच त्याच्या यशाचा आणि अपयशाचा आधार असतो. इज्जत मिळवायला वर्षे लागतात पण माणसाची एक चूक ती नष्ट करू शकते.

चाणक्‍यांनी सांगितले आहे की, अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशी कधीही तडजोड करू नये. ज्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुम्ही ही एक गोष्ट पणाला लावू नये. नाहीतर तुम्ही नातेसंबंध, आदर (Respect) आणि सर्व काही गमावून बसाल. तसेच वर्षानुवर्षे कष्ट करून मिळालेला आदर या एका चुकीनंतर आयुष्यभर कलंकित होऊन जाईल.

प्रतिमेची हानी होईल

स्वाभिमान हे माणसाच्या भांडवलाप्रमाणे आहे, कारण ते वर्षानुवर्षे स्व कष्टाने कमवावे लागते. आणि जे मरेपर्यंत आपल्याला जपावे लागते. चाणक्य म्हणतात की, तुम्ही कोणासमोर नतमस्तक हे तुम्हाला माहिती असने आवश्यक आहे, जेणे करून तुमचा स्वाभिमान (Self Respect) दुखावला जाणार नाही.

जर तुमचा स्वाभिमान दुखावला गेला तर तुमच्या प्रतिमेवर सुद्धा डाग लागू शकतो. आणि अशातच तुम्ही त्या डागाला पुसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही. उदाहरणार्थ, ताटात चार ऐवजी दोन चपात्या असल्या तरी त्या आदरणीय दर्जाच्या असल्या पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे. जीवनात असे काहीही नाही ज्यासाठी स्वाभिमानाशी तडजोड करावी लागते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असा स्वाभिमान राखा

चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती आपल्या स्वाभिमानावर ठाम राहतो, त्याचे दुःख त्याच्यापासून दूर राहतात. स्वाभिमानाशी तडजोड करून जीवन जगणे नेहमीच वेदनादायक असते. जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक (Mental Health), शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असते तेव्हा आत्मसन्मानाशी तडजोड अनेकदा होते. तुमचा स्वाभिमान उंच ठेवायचा असेल तर तुम्हाला या तिघांवर स्वावलंबी राहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT