Chanakya Niti Mantra For Success  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti Mantra For Success : नीतिशास्त्रातील या श्लोकांमध्ये दडले आहे यशाचे रहस्य, जाणून घ्या

Mantra For Success : आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतीद्वारे अनेक तरुणांना ज्ञानाचे महत्त्व आणि त्याचे फायदे समजावून सांगितले आहेत.

Shraddha Thik

Chanakya Niti :

ज्या व्यक्तीला शास्त्राचे ज्ञान असते त्याला जीवनात नेहमी यश मिळते. तसेच समाजात त्याचे नाव सदैव उंच राहते. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतीद्वारे अनेक तरुणांना ज्ञानाचे महत्त्व (Importance) आणि त्याचे फायदे समजावून सांगितले आहेत.

ज्ञानाने माणसाला देवी-देवतांचे आशीर्वाद कसे मिळू शकतात हेही सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. जीवनातील महत्त्वाची मूल्ये त्यांनी सुविचार आणि श्लोकांच्या रूपाने अनेक तरुणांपर्यंत पोहोचवली आहेत. सध्याच्या काळातही ही धोरणे असंख्य तरुणांना मार्गदर्शन करत आहेत.

चाणक्य नीतीचे श्लोक

अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः ।

धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।।

चाणक्यनीतीच्या या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, शास्त्राच्या नियमांचे सतत आचरण केल्याने मनुष्याला शिक्षण (Education) मिळते. त्यांना आयुष्यात बरोबर की चूक कळते. अशा व्यक्तीलाच उत्तम ज्ञान असते आणि अशा व्यक्तीलाच जीवनात यश मिळते. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात ज्ञान प्राप्त करण्यापासून कधीही मागे हटू नये.

आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेध्दनैरपि ।

नआत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।।

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, व्यक्तीने आपल्या आयुष्यात सर्व सुखांचा उपभोग घेतला पाहिजे. पण जेव्हा त्यागाची वेळ येते तेव्हा तसे करण्यापासून मागे हटू नये. त्यामुळे अडचणी टाळण्यासाठी त्याने पैसे (Money) वाचवत राहावे. पण तुमच्या पत्नीच्या रक्षणासाठी तुम्हाला पैशाचा त्याग करावा लागला तरी तुम्ही मागे हटू नका. चाणक्य नीतीमध्ये पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीला आपल्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण संपत्तीचा त्याग करावा लागला तरी त्याने तसे केले पाहिजे. अशा व्यक्तीलाच जीवनात आनंद मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : शिर्डीत साई दरबारी घोषणा! प्रवीण तरडेंनी घेतलेला निर्णय वाचून छाती अभिमानाने फुलेल

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

SCROLL FOR NEXT