आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ आपले काम वेळेत पूर्ण करणे पुरेसे राहिलेले नाही. कंपनीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि करिअरमध्ये सातत्याने प्रगती करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे काही विशेष कौशल्ये असणे आवश्यक आहे.
बदलते तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर आणि कामाच्या बदलत्या पद्धती यामुळे कंपन्यांनाही बहुगुणी कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्वतःला महत्त्वाचे आणि विश्वासार्ह बनवायचे असेल, तर पुढील पाच कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
कार्यालयात वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि ग्राहकांशी योग्य संवाद साधता येणे महत्त्वाचे आहे. आपले विचार स्पष्टपणे मांडणे, इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे आणि गरजेनुसार योग्य प्रतिसाद देणे यामुळे कामातील गैरसमज कमी होतात. उत्तम संवादामुळे सहकाऱ्यांमध्ये विश्वासही निर्माण होतो.
काम करताना अनेकदा वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. अशा वेळी केवळ समस्यांकडे लक्ष वेधण्याऐवजी त्यावर व्यावहारिक उपाय सुचवणारे कर्मचारी अधिक महत्त्वाचे ठरतात. समस्येचे मूळ कारण शोधून योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.
डिजिटल युगात नवीन तंत्रज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे. एआय टूल्सचा योग्य वापर केल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढवता येते. मात्र तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःची विचारशक्ती आणि निर्णयक्षमता टिकवणेही महत्त्वाचे आहे.
कोणत्याही संस्थेचे यश हे सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून असते. सहकाऱ्यांना मदत करणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि संघभावनेने काम करणे यामुळे तुमचे महत्त्व वाढते.
करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन गोष्टी शिकणे आणि बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. नियमितपणे कौशल्ये अद्ययावत केल्यास भविष्यातील संधींचा लाभ घेता येतो
एकंदरीत, केवळ मेहनत नव्हे, तर कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, सहकार्य आणि बदल स्वीकारण्याची तयारी यामुळे कर्मचारी संस्थेसाठी अधिक मौल्यवान ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.