Butterfly Forest In India Saam Tv
लाईफस्टाईल

Butterfly Forest In India: फुलपाखरु छान किती दिसते ! भारतातल्या या फुलपाखराच्या जंगलाविषयी माहिती आहे का ?

कर्नाटकातील या फुलपाखरु जंगलाविषयी या गोष्टी माहित आहे का ?

कोमल दामुद्रे

Butterfly Forest In India : आपल्याला फिरायला जायचे असेल तर आपल्या मनात आधी डोंगराळ भागात किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्याचा विचार आपण सर्वात आधी करतो.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना निसर्गाचा (Nature) आनंद घ्याचा असतो म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांना पर्वतांवर नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते, तर तिथे त्यांना समुद्राजवळ आराम आणि मजा करायला मिळते. निसर्ग पाहून तुमचे मन प्रसन्न झाले तर तुम्ही कर्नाटकातील फुलपाखराच्या जंगलाच्या प्रेमात पडाल. येथे हजारो प्रकारची फुलपाखरे आहेत. याशिवाय पक्ष्यांच्या (Birds) किलबिलाटात आणि हिरवाईत वेळ घालवायला मिळतो. हे जंगल भारतातील घनदाट जंगलांपैकी एक आहे, दक्षिण भारतातील कर्नाटकात असलेले बटरफ्लाय फॉरेस्ट. हे जंगल कर्नाटकातील कोडगू, मलनाड आणि दक्षिण कन्नड यांनी वेढलेले आहे.

फुलपाखरू जंगलाविषयी -

कर्नाटकातील या प्रसिद्ध फुलपाखरू जंगलाचे नाव बिसले घाट आहे. बिसले घाट जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे लाखो फुलपाखरे आढळतात. पावसात या घनदाट जंगलात स्थलांतरित फुलपाखरे दिसतात. या जंगलात कॉमन कॅस्टर, कॉमन ग्लास यलो, कॉमन जे, प्लेन टायगर, स्पॉटेड पोपट, लाइन ब्लू, बाल्का पोपट, डिंगी स्विफ्ट इत्यादी प्रकारची फुलपाखरं आहेत. याशिवाय हजारो प्रकारचे पक्षी या जंगलात पाहायला मिळतात.

येथे जायचे कसे ?

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथे हे जंगल आहे. येथे जाण्यासाठी तुम्ही सकलेशपूर बस किंवा ट्रेनच्या मदतीने जाऊ शकता. सकलेशपूर ते २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बिसाळे घाटापर्यंत टॅक्सी आणि बसेसही धावतात. पावसाळ्यात आपण या निसर्गरम्य जंगलाला भेट देऊ शकतो. निसर्गाने नटलेल्या वनराईमुळे आपल्याला येथील दृश्य सुंदर दिसते. तसेच पावसात या दरीत फुलपाखरेच नाही तर स्थलांतरित पक्षीही पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT