Burn First Aid  saam tv
लाईफस्टाईल

Burn First Aid : दिवाळीत भाजल्यावर बर्फ, टूथपेस्ट लावता? ही चूक करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला वाचा

Diwali Safety : दिवाळीत फटाके किंवा गरम तेलामुळे भाजल्यावर बर्फ, टूथपेस्ट लावू नका.

Sakshi Sunil Jadhav

भारतात दिवाळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरी फराळ तयार केला जातो, दारात रांगोळ्या , कंदील लावलं जातं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. पण याच उत्साहात कधी गरम तेलाचा हाताला चटका बसतो, तर कधी फटाक्यांमुळे भाजण्याची दुर्घटना घडते.

अशा वेळेस घरातले लोक घाबरून जातात आणि जखमेवर लगेच बर्फ, टुथपेस्ट किंवा एखादं मलम लावतात. पण अशाप्रकारचे घरगुती उपाय जखम जास्त गंभीर करू शकतात. त्यामुळे भाजल्यावर घाबरून न जाता पहिल्या २० मिनिटांत योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

भाजल्यानंतर सर्वात आधी काय केलं पाहिजे?

प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कन्सल्टंट डॉ. अनुपम गोलाश यांच्या मते, भाजल्यानंतर सर्वात आधी जखमी झालेला भाग थंड केला पाहिजे. भाजलेला भाग नळाच्या साध्या थंड पाण्याखाली २० मिनिटं ठेवला पाहिजे. त्याने त्वचेचं तापमान कमी होतं आणि जखम जास्त गंभीर होत नाही. पण यासाठी बर्फासारखं जास्त थंड पाणी वापरणं टाळावं.

दागिने आणि घट्ट कपडे वापरणं थांबवलं पाहिजे. सूज येण्याआधी हातातल्या अंगठ्या, घड्याळ किंवा इतर घट्ट वस्तू काढून टाकाल्या पाहिजेत. तसेच त्वचेला कपडे चिकटलेले असतील तर जबरदस्तीने ते ओढू नका.

जखम झाकून ठेवा

भाजलेला भाग थंड झाल्यानंतर स्वच्छ, मऊ आणि लिंट नसलेल्या कपड्याने तो सैल झाका. क्लिंग फिल्मचाही एक थर तुम्ही वापरू शकता. पण घट्ट गुंडाळणं टाळा.

भाजलेल्या जागेवर चुकूनही लावू नका या गोष्टी

भाजल्यानंतर काही लोक लगेच टूथपेस्ट, बर्फ, लोणी, तेल किंवा घरगुती मलम लावतात. पण असं करणं टाळा. त्याने त्वचेला जास्त त्रास होऊ शकतो आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच भाजल्यामुळे फोड आले असतील तर ते फोडू नका. तर कोणतीही जखम झाली की त्यावर घरगुती उपचारावर अवलंबून न राहता डॉक्टरांकडे धाव घ्या.

लक्षात ठेवा: भाजल्यानंतरची पहिली २० मिनिटे महत्त्वाची असतात. योग्य पद्धतीने जखम थंड करा, घरगुती उपाय टाळा आणि गरज भासल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

Maharashtra News Live Update: गिरगाव चौपाटीवर छटपूजेला न्यायालयाचा नकार

गोकुळमधील २५ वर्षांची 'महाडिक सत्ता' संपली? यंदा त्या पॅटर्नला ब्रेक, अध्यक्षपदासाठी ४ नावं चर्चेत; कुणाची लागणार वर्णी?

Shocking: २ महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीनिमित्त घरी आले; घरात आढळले शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह

SCROLL FOR NEXT