Budh Gochar 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! पुढील महिनाभर या राशी मालामाल, जोडीदाराशी विवाद टाळा

Budh Gochar Horoscope : बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. कुंडलीत मिथुन आणि कन्या राशीवर बुध ग्रहाचा अधिकार आहे. २ जानेवारीला बुध ग्रहाचे संक्रमण धनु राशीत झाले आहे. त्यामुळे या ग्रहाचे फल यशस्वी व्यवसाय करण्याची क्षमता प्रदान करते.

कोमल दामुद्रे

Budh Gochar 2024 In Dhanu Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. बुध ग्रहाला तर्कशास्त्राचे कारक मानले जाते. बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. कुंडलीत मिथुन आणि कन्या राशीवर बुध ग्रहाचा अधिकार आहे.

२ जानेवारीला बुध ग्रहाचे संक्रमण धनु राशीत झाले आहे. त्यामुळे या ग्रहाचे फल यशस्वी (Success) व्यवसाय करण्याची क्षमता प्रदान करते. तसेच बुध बलवान असेल तर संवादाच्या क्षेत्रात यश मिळेल. हे लोक बुद्धिमान, मुत्सद्दी आणि राजकीयदृष्ट्या कुशल असतील. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे पुढील महिनाभर कोणत्या राशी लखपती बनतील जाणून घेऊया

1. मेष

बुध ग्रहाचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अधिक फायदेशीर (Benefits) ठरेल. या काळात यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच कामात यश मिळेल. समाजात स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक (Money) स्थिती मजबूत होईल. धार्मिक कार्यात रुची राहिल. जोडीदाराशी वाद टाळा.

2. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे लाभ होतील. बुधादित्य राजयोगामुळे पुढील महिनाभर आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना चांगला नफा होईल. करिअरमध्ये फायदा होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहिल. आत्मविश्वास वाढेल.

3. कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायक ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पैसे मिळतील. समाजात मान सन्मान मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. जबाबदारी वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या

4. धनु

बुधाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानले जाते. बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी काळ चांगला जाईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्तप्रवास करावा लागेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून आणलेली काकडी कडू निघाली? फेकून देऊ नका, 'या' सोप्या ट्रिकने घालवा कडवटपणा

Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! लॉजमध्ये जखमी अवस्थेत आढळले बहीण-भाऊ; कारण अत्यंत चिंताजनक, पोलीसही हादरले

Maharashtra News Live Update: पुणे नाशिक महामार्गावर तिरंगा हातात घेत चार तरुणांचे आंदोलन

Rain Alert : शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा? IMD ने ५ दिवसांचा अंदाज सांगितला; विकेंडला पाऊस कोसळणार का?

आषाढी एकादशीसाठी उपवासाला बनवा चविष्ट शेंगदाण्याचे लाडू, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT