World Boss Day 2024 Saam TV
लाईफस्टाईल

World Boss Day 2024 : ऑफिसमध्ये बॉससोबत ताळमेळ जुळत नाही; आजच्या खास दिवशी अशा द्या शुभेच्छा

Boss Day 2024: बॉसचे मन जिंकण्यासाठी आज जागतिक बॉस दिनानिमित्त त्यांना हे शुभेच्छांचे संदेश पाठवा.

Ruchika Jadhav

बॉस म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती. बॉस असं म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती उभ्या राहतात. काहींना बॉसचं नाव ऐकलं की राग येतो. तर काहींना बॉसचं नाव ऐकून आनंद सुद्धा होतो. आता बॉसबरोबर प्रत्येक व्यक्तीचं पटतंच असं नाही. शक्यतो बॉससोबत अनेकांचं पटत नाही. मात्र तरीही आपल्या आयुष्यात त्यांच्यासाठी आदराचं स्थान असतं.

आता तुमचंही तुमच्या बॉससोबत पटत नसेल आणि तुम्ही त्यांना खूश करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बॉसला खूश करण्याची एक ट्रिक आणली आहे. आज १६ ऑक्टोबर बॉस डे आहे. सर्व ऑफिसमधील बॉसचा आजचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉसला या दिवसानिमित्त शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही काही सुंदर कोट मॅसेज शोधले आहेत. हे तुम्ही बॉसला पाठवून त्यांना खूश करू शकता.

आमच्यासाठी फक्त बॉस नसून एक चांगले मित्र आणि मार्गदर्शक देखील आहात. तुम्हाला बॉस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस एका दिलदार मनाचा, दिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा, दिवस आमच्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तीचा साहेब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बॉस नाही तर मित्र म्हणून पाठीशी उभे राहिलात आता तुमच्या आयुष्याची नवी पहाट होते आहे, बॉस दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा!

येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने उत्साहाने उजळून निघावा; आरोग्य निरोगी असावे, यश भरपूर मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना साहेब तुम्हाला साहेब दिनाच्या शुभेच्छा

स्वतःचे करिअर घडवताना कितीही संकटे आली तरी ही जीवनात आनंदी कसं राहायचं हे मी तुम्हाला बघून शिकलो बॉस तुम्हाला जागतिक बॉस दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जर कधी चुकला रस्ता माझा तर तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला; काय बरोबर आणि काय चूक यातील फरक तुम्ही मला सांगितला, तुम्हाला जागतिक बॉस दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT