Daily Fruits That Protect Against Heart Disease saam tv
लाईफस्टाईल

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Daily Fruits That Protect Against Heart Disease: बिघडलेल्या जीवनशैलीमुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो. आहारात फळांचा समावेश करा. ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी होईल मदत.

Bhagyashree Kamble

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे. वजन वाढणे, थकवा, मानसिक तणाव आणि ह्रदयविकाराच्या संबंधित त्रास वाढतो. योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलसारख्या समस्या वाढतात. जे हळूहळू ह्रदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे ह्रदय. ह्रदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन आहारात काही नैसर्गक आणि पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचं आहे. ह्रदयाच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम ब्लड फ्लो गरजेचं आहे. ब्लड फ्लोमध्ये ब्लॉकेज झाल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासाठी काही फळांचा आहारात समावेश करा.

सफरचंद

हावर्ड हेल्थ या वेबसाईटनुसार, सफरचंद ह्रदयसाठी सर्वोत्तम फळ मानला जातो. या फळामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यासह या फळातील अँटिऑक्सिडंट्स नसांमधील दाह कमी करण्यास मदत करतात. रोज एक सफरचंद खाल्ल्यास ह्रदय निरोगी राहते.

पपई

हेल्थलाईन या वेबसाईटनुसार, पपई आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यात आवश्यक अँटिऑक्सिडंट्स असतात. जे ह्रदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. पपई रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच पचनक्रियाही सुधारते. नियमित पपई खाल्ल्याने ह्रदय निरोगी राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? विराट कोहलीने स्वतःच केला खुलासा

Voter List Fraud: व्होट चोरीचा आणखी एक पुरावा; बदलापूरमध्ये १७ हजार बाहेरील मतदार

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT