Technology  Saam Tv
लाईफस्टाईल

Technology : फक्त 1 रुपयांत बुक करा रेल्वेचे टिकीट, कसे जाणून घ्या

भारतात रेल्वेचे तिकीट बुक करणे कठीण काम आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Technology : भारतात रेल्वेचे तिकीट बुक करणे कठीण काम आहे. रेल्वेची तिकिटे बुक करण्यासाठी प्रवाशांना वारंवार प्रयत्न करावे लागतात.

भारतात रेल्वेचे तिकीट बुक करणे कठीण काम आहे. रेल्वेची तिकिटे बुक करण्यासाठी प्रवाशांना वारंवार प्रयत्न करावे लागतात. अनेक वेळा प्रवाशाचे वेटिंग तिकीट कन्फर्म केले जाते. परंतु अनेक वेळा प्रवाशांना जागा मिळत नसल्याने शेवटच्या क्षणी त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर तिकीट बुकिंग अॅप ट्रेनमॅनने एक नवीनफिचर आणले आहे. यामध्ये प्रवाशांना कन्फर्म ट्रेनच्या तिकिटाची हमी दिली जाणार आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा बाय म्हणजे जर तुमचं ट्रेनचं (Train) तिकीट कन्फर्म झालं नाही तर कंपनी (Company) तुम्हाला प्रवास करण्यासाठी विमानाचं तिकीट देईल.

हे वैशिष्ट्य कसे कार्य करते?

खरं तर, ट्रेनमॅन अॅपने ट्रिप अॅश्युरन्स नावाचे एक नवीन वैशिष्ट्य लाँच केले आहे. या नव्या फीचरच्या मदतीने वेटिंग लिस्टेड रेल्वे प्रवासी आपला प्रवास पूर्ण करू शकतात. या अॅपद्वारे जो कोणी रेल्वेचे तिकीट बुक करेल तो अॅपमध्येच आपल्या तिकिटाचे स्टेटस चेक करू शकतो. जर प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले नाही, तर तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे, हे अॅपवरून दिसून येईल. चार्ट बनवण्याआधी तुमचं तिकीट कन्फर्म झालं नाही, तर प्रवासी ट्रिप अॅश्युरन्स फीचरच्या मदतीने शेवटच्या क्षणी विमान तिकीट बुक करू शकतात.

अॅपमध्ये प्रवाशाचे तिकीट बुक होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक दिसत असेल, तर अॅप १ रुपये ट्रॅप अॅश्युरन्स फी आकारेल. ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर कंपनी तिकिटाच्या क्लासच्या आधारे नाममात्र शुल्क आकारेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर चार्टिंगच्या वेळी रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले तर ट्रिप अॅश्युरन्स फी परत मिळेल. मात्र, तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वेवाले प्रवाशाला प्रवास पूर्ण करण्यासाठी मोफत विमान तिकीट देणार आहेत.

या गाड्यांसाठी मिळणार सुविधा -

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रिप अ ॅश्युरन्सचे हे वैशिष्ट्य सध्या सर्व आयआरसीटीसी राजधानी गाड्या आणि सुमारे १३० इतर गाड्यांसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमन अॅप मशीन लर्निंगसारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करते आणि आयआरसीटीसीचे अधिकृत भागीदार आहे. प्रवाशांना अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ट्रिप अॅश्युरन्स फीचर सुरू करण्यात आले आहे.

रिपोर्ट्सनुसार, वेटिंग तिकीट कन्फर्म करण्याची शक्यता सांगण्यात ९० टक्के अचूक असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. पण, जर तिकीट कन्फर्म झालं नाही तर कंपनी त्या व्यक्तीला मोफत विमान तिकीट देईल. मात्र, ज्या शहरांमध्ये विमानतळ आहेत, अशा शहरांसाठीच ट्रिप अॅश्युरन्सची ही सुविधा लागू असेल.

Edited By : Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Captain kharat : बलात्कार प्रकारणातील कॅप्टनचं आणखी एक प्रकरण उघड, शिर्डी कनेक्शन आलं समोर

Vastu Tips Of Money Attract: घराच्या कोपऱ्यात ठेवा ही वस्तू, वर्षभर भासणार नाही पैशाची कमतरता

Maharashtra Live News Update: भिवंडी-ठाणे मार्गावर भीषण आग, मार्केटमधील फर्निचरची १५ दुकाने खाक

Bhiwandi Fire : फर्निचर बाजारात आग्नितांडव, १५ दुकानांचा कोळसा, भिवंडीत जिकडे तिकडे धूरच धूर

HDFC Bank च्या चेअरमनचा अचानक राजीनामा, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT