Board Exam Saam Tv
लाईफस्टाईल

Board Exam साठी या पद्धतीने तयारी करताय? होऊ शकतो मुलांच्या आरोग्यावर परिणाम, वेळीच घ्या काळजी

Study Tips For Student: लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सुरुवात केली असेल. अशावेळी बरेचदा मुले दिवसभर बसून अभ्यास करताना दिसावी अशी अनेक पालकांची इच्छा असते.

कोमल दामुद्रे

Study Tips :

लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सुरुवात केली असेल. अशावेळी बरेचदा मुले दिवसभर बसून अभ्यास करताना दिसावी अशी अनेक पालकांची इच्छा असते.

पालकांच्या (Parents) या चिंतेमुळे मुले दिवसभर एकाच जागी बसून अभ्यास करतात. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. डॉक्टरांच्या मते, दिवसभर अभ्यास केल्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी पाहायला मिळाल्या आहेत. त्यासाठी पालकांनी मुलांच्या वेळेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करायला हवे. ज्यामुळे त्यांना परीक्षेचा (Exam) अधिक प्रमाणात ताण (Stress) येणार नाही जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.

1. एकाच जागी बसून राहाणे

सतत एकाच जागी बसून राहिल्याने मानेचा त्रास होतो. तसेच डोकेदुखी आणि पाठदुखीची समस्या जाणवू लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास डोळे, मान आणि स्नायूंना त्रास होतो तसेच वेदना सुरु होतात.

2. बेडवर बसून वाचणे

सतत बेडवर बसून वाचल्यामुळे मुलांना डोकेदुखी, मान दुखणे, स्नायू दुखी, पाय, कंबर दुखणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. सतत खाली वाकून वाचल्यामुळे मानेवर ताण येतो. ज्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

3. नकारात्मक परिणाम

मुले दिवसभर पुस्तकात डोक घालून बसतात त्यामुळे त्याची शारीरिक हालचाल कमी होते. ज्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच मनात अनेक नकारात्मक विचार देखील येतात. दिवसभर लक्ष न देता अभ्यास केल्यास आरोग्यावर परिणाम होतो.

4. झोप आवश्यक

परीक्षेच्या दिवसांमध्ये पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही एक तासांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करत असाल तर किमान १० मिनिटांचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. ४ ते ५ तास अभ्यास करत असाल तर एक तास खेळा किंवा शारीरिक हालचाली करा. या काळात किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT