Blue Tea Saam Tv
लाईफस्टाईल

Blue Tea : तुम्ही कधी निळ्या चहाचे सेवन केले आहे का ? चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर

कधी निळा चहा प्यायला आहात का ? तुम्ही तो कधी पाहायला तरी आहे का ?

कोमल दामुद्रे

Blue Tea : शरीराला जितकी आवश्यकता पाण्याची आहे तितकीच चहाची देखील. भारतात पाण्यानंतर चहा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ आहे. चहामध्ये हर्बल, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी अनेक प्रकारचे लोकप्रिय चहा प्यायले मिळतात पण, तुम्ही कधी निळा चहा प्यायला आहात का ? तुम्ही तो कधी पाहायला तरी आहे का ?

या चहाबद्दल माहिती असणारे किंवा कधी पाहिलेले लोक फार कमी असतील. ब्लू बटरफ्लाय मटारच्या फुलांपासून ब्लू टी बनवला जातो. हे फक्त सुंदर दिसत नाही तर चवीलाही छान लागते. या चहामुळे तुमचा थकवा तर दूर होईलच पण त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.

ब्लू टी बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये एक कप पाणी गरम करा. पाणी थोडे कोमट झाल्यावर त्यात चार ते पाच ब्लू बटरफ्लाय मटारची फुले टाकून चांगले उकळा. यानंतर गॅस बंद करून त्यात मध घालून गरमागरम प्या.

ब्लू टीचेही अनेक आरोग्याला फायदे

1. शरीर ऊर्जावान ठेवा

निळ्या चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि त्याचा अप्रतिम वास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतो.

2. शरीराला डिटॉक्स करते

ब्लू टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच आपले केस आणि त्वचा सुधारतात. तसेच शरीरातील घाण डिटॉक्स करण्याचे काम करते.

3. हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम

ब्लू टीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेची (Sugar) पातळी देखील राखतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लू टी हा उत्तम पर्याय आहे.

4. वजन कमी करते

ज्यांना आपले वजन नियंत्रित करायचे आहे त्यांच्यासाठी ब्लू टी उत्तम आहे कारण त्यात असलेले कॅटेचिन वजन नियंत्रित ठेवतात. हे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याचे काम करते आणि शरीराच्या टोनमध्ये येते.

5. मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

काळा, हिरवा चहा सर्व प्रकारचा ताण आणि चिंता दूर करण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे, निळा चहा मानसिक विकार दूर करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे. निळ्या चहामुळे मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते असे अनेक अभ्यासात आढळून आले आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT