Blood Cancer Symptoms Saam tv
लाईफस्टाईल

Blood Cancer Symptoms : सतत थकवा येणे, वजन कमी होणे असू शकतो ब्लड कॅन्सरचा आजार? चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Blood Cancer Sign : जगभरात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. सर्व वयोगटातील लोक या आजाराला बळी पडताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Blood Cancer Causes :

हल्ली कर्करोगसारख्या जीवनघेण्या आजाराला माणूस सहज बळी पडतो. जगभरात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. सर्व वयोगटातील लोक या आजाराला बळी पडताना दिसून येत आहे.

कर्करोग हा जगभरातील मृत्यूचे दूसरे प्रमुख कारण म्हणून ओळखला जातो. शरीरातील पेशी असामान्यपणे वाढू लागल्यास कर्करोग होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार असून त्यातील एक ब्लड कॅन्सर. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये बहुतेक प्रकार हाडांच्या मज्जातंतूपासून सुरु होतात. ब्लड कॅन्सर कसा होतो. त्याची लक्षणे कोणती जाणून घेऊया.

1. सतत थकवा येणे

रोज रोज काम करुन शरीरात थकवा जाणवतो. काही वेळ नीट खाण-पिण न झाल्यामुळे थकवा जाणवू लागतो. शरीरात रक्ताची कमतरता झाल्यामुळे अॅनिमियाची समस्या उद्भवते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

2. अचानक वजन कमी (Weight Loss) होणे

कर्करोगाच्या पेशी वाढल्याने चयापचयमध्ये बदल होतो. ज्यामुळे वजन अचानक कमी होते. हे लक्षण ब्लड कॅन्सरच्या आजाराच्या सुरुवातीचे लक्षण (Symptoms) आहे.

3. सतत संक्रमण होणे

सतत आजारी पडणे किंवा लगेच संसर्गाला बळी पडत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. यावेळी शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते.

4. शरीरातील लिम्फ नोड्स सुजणे

लिम्फ नोड्स सुजण्याची अनेक कारणे असू शकतात. बरेचदा याकडे आपण दुर्लक्ष करतो. जर तुमच्या मान किंवा हाताखालच्या भागात दुखत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5. हाडे दुखणे

सतत पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर हे ब्लड कॅन्सरचे (Cancer) लक्षण समजले जाते. यासाठी वेळीच तपासणी करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT