Skin care tips, Dark spots problem, Beauty tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Beauty tips : डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे आहेत ? त्वचेवर डाग आहेत ? तर हा उपाय करुन पहा

डोळ्यांच्या खाली असणाऱ्या काळ्या वर्तुळांना बाय बाय कसे कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपण अधिक सावध असतो. आपल्या चेहऱ्यावरून आपले आरोग्य कळण्यास मदत होते.

हे देखील पहा -

डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे असतील किंवा त्वचेवर वर्ण दिसत असतील तर आपली चिंता अधिक वाढू लागते. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करत असतो. बाजारात त्वचेचा सुंदरपणा टिकवण्यासाठी अनेक नवनवीन उत्पादने मिळतात. परंतु, त्याचा वापर केल्याने डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे ही अधिक गडद दिसू लागतात किंवा ती जशी होती तशीच दिसू लागतात परंतु आज आम्ही तुम्हा सोपी युक्ती सांगणार आहोत ज्यामुळे डोळ्यांच्या खाली असणारी काळी वर्तुळे सहज दूर होतील.

१. दूध आणि व्हिटॅमिन ई डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. व्हिटॅमीन ई च्या कॅप्सूलमध्ये दूध समप्रमाणात मिसळवून ते डोळ्यांच्या खाली असणारे काळ्या वर्तुळांवर लावा. काही काळाने ते पाण्याने स्वच्छ करा. डाग कमी होतील.

२. बेसन, दूध (Milk) व हळद हे आपल्या प्रत्येकाच्या घरात सहज मिळणारे पदार्थ आहे. हळद ही आरोग्यासाठी बहुगुणी मानली जाते. बेसन, दूध व हळदीचे मिश्रण करुन डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर किंवा वर्णावर लावल्यास फायदा होईल.

३. कोरफडचा त्वचेसाठी (Skin) अधिक फायदा होतो. दूधात कोरफडचे जेल मिक्स करुन डोळ्यांजवळ लावा व हलक्या हाताने मसाज करा. काही वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

४. हे उपाय करताना यातील कोणताच घटक डोळ्यांच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या. कोणतेही मिश्रण चेहऱ्याला लावण्यापूर्वी ते आधी आपल्या हाताला लावू तपासून घ्या यामुळे आपल्या त्वचेला कोणताही त्रास होणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best fruit for cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलंय? दररोज खा हे एक फळ, रक्तवाहिन्यांमधील चरबी खेचून काढेल बाहेर

Fatty Liver : तुम्हाला फॅटी लिव्हरचा धोका आहे का? घरबसल्या १ मिनिटात करा चेक

Heart attack prevention: रोज फक्त 2 मिनिटं करा हे काम; हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो कमी!

Maharashtra News Live Update: मनसेचा मेळावा; राज ठाकरे DJवर बोलणार?

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच HRA मध्येही मोठा बदल

SCROLL FOR NEXT