पत्रिका न जुळणे हे लग्न मोडण्याचे कारण असू शकत नाही- उच्च न्यायालय Saam TV
लाईफस्टाईल

पत्रिका न जुळणे हे लग्न मोडण्याचे कारण असू शकत नाही- उच्च न्यायालय

कालांतराने अविशेकने तिला गर्भपात करण्यास सांगून तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

सुरज सावंत

मुंबई: लग्न करण्याचे आमीष दाखवून महिलेशी शारिरीक संबध ठेवून कालांतराने पत्रिका जुळत नसल्याचे कारण देत लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नकार दिला. बदलापूर परिसरात राहणारा आरोपी अविशेक मिश्रा हा पंचताराकित हाँटेलमध्ये काम करत असून त्याचे सोबत असलेल्या सहकारी महिलेशी प्रेमसंबध होते. लग्नाचे वचन देत त्याने तिच्याशी शारिरीक संबध ठेवले यातून ती गरोदर राहिली. मात्र कालांतराने अविशेकने तिला गर्भपात करण्यास सांगून तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने 2012 साली अविशेक विरोधात बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा नोंदवला. पोलिसा़नी केलेल्या समुपदेशनानंतर अविशेखने लग्नास तयारी दर्शवली. मात्र नंतर पत्रिका जुळत नसल्याचे कारण पुढे करत पून्हा लग्नास नकार दिला. आरोपातून दोषमुक्त होण्यासाठी अविशेखने दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज फेटाळल्याने अविशेखने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही अविशेख मिश्राला पत्रिका जुळत नाही. म्हणून लग्न करणार नाही हे चुकीचं असल्याचं मत नोंदवत याचिका फेटाळून लावली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Viral monkey Punch: आईनंच चिमुकल्याला दूर केलं; माकडानं शोधली बाहुल्यात मायेची उब

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्...

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

SCROLL FOR NEXT