Daily योग: जाणून घ्या पवनमुक्तासन करण्याचे फायदे Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग: जाणून घ्या पवनमुक्तासन करण्याचे फायदे

वर्क फ्रॉम होम करताना कामाचे तासही वाढले आहेत आणि कामादरम्यान पुरेसा ब्रेकही घेता येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या अनेक क्षेत्रं अनलॉक होत असली तरी बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम करताना कामाचे तासही वाढले आहेत आणि कामादरम्यान पुरेसा ब्रेकही घेता येत नाही. त्यामुळे अनेकांना मणक्याच्या, मानेच्या आणि पाठीच्या दुखण्यानं ग्रासलं आहे. तासंतास एकाच जागी चुकीच्या पद्धतीने बसणं, ब्रेक न घेता काम करणं, हालचालींचा किंवा व्यायामाचा अभाव यांमुळे हा त्रास अधिक वाढतो. अशावेळी काही योगासने ही अत्यंत फायदेशीर ठरतात. पवनमुक्तासन हे त्यापैकीच एक आसन आहे.

हे देखील पहा -

पवनमुक्तासन कसे करावे?

प्रथम शवासनाच्या स्थितीत या. त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू गुडघ्यात दुमडून छातीजवळ आणा. दोन्ही हातांनी गुडघे धरा. या स्थितीत मान सरळ ठेवा. हे आसन प्रथम एका पायाने, नंतर दुसऱ्या पायाने आणि शेवटी दोन्ही पायांनी एकत्र केला जाऊ शकतो.

पवनमुक्तासन करण्याचे फायदे-

- कमरेचे स्नायू ताणले जातात.
- ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात आणि पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.
- पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
- पाठीचा कणा बळकट होतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शिंदेंसेनेचे पाटील

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून नियोजित हत्या! रोहिणी खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

शिवसेना सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात! बाळासाहेब पाटील प्रकरणाचा दाखला, सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं? वाचा सविस्तर

Government Job : सरकारी नोकरीसाठी २ मुलांची अट संपली! पण सरकारचा नवा नियम, जाणून घ्या महत्त्वाची अट

Voter List: मतदार यादीमध्ये अनियमितता, २ निवडणूक अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; सरकारची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT