Weight Loss Mistakes Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Avoid These Mistakes For Weight Loss : आपण बारीक का होत नाही? नेमकं काय चुकतंय याची कारणे जाणून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आज त्याबाबतच अधिक माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी व्यक्ती विविध एक्सरसाइज करतात. जीम लावतात, डाएट फॉलो करतात, मात्र तरीही काहींचं वजन कमी होत नाही. त्यामुळे व्यक्ती नैराश्यात जातात. अशावेळी आपण बारीक का होत नाही? नेमकं काय चुकतंय याची कारणे जाणून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आज त्याबाबतच अधिक माहिती जाणून घेऊ.

कमी हालचाल

अनेक व्यक्ती फक्त वर्कआउट करतानाच आपल्या शरीराची हालचाल करतात. वर्कआउट केल्याने आपल्या शरीरात वेदना होतात. स्वीटपेन सुरु होतं त्यामुळे जिममधून बाहेर आल्यानंतर त्या व्यक्ती आजिबात काहीच काम करत नाहीत. बसल्या जागी सर्व कामे इतरांना करायला सांगतात. तसेच भरपूर खातात आणि जास्त झोपतात. त्यामुळे बर्न झालेल्या कॅलरी पुन्हा झपाट्याने वाढतात.

स्किप एक्सरसाइज

स्विटपेन होत असले तरी देखील व्यायाम सुरु ठेवला पहिजे. मात्र काही व्यक्ती व्यायाम स्किप करतात. हालचाल न केल्याने त्यांना जास्तप्रमाणात स्विटपोन होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास त्या व्यक्ती टाळाटाळ करतात. नियमीतता नसल्याने वजन आहे त्यापेक्षा आणखी वाढतं किंवा अजिबात कमी होत नाही.

एकच व्यायाम करणे

काही व्यक्ती घरात व्यायाम करतात. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नसल्याने ते दररोज एकच व्यायाम करतात. रोज उठून एकच स्टेप केल्याने देखील वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी सर्व मसल्सचा व्यायाम झाला पाहिजे.

जास्त फळं खाणे

वर्कआउट करणाऱ्या व्यक्ती प्रोटीन मिळेल या भावनेने जास्त फळं खातात. फळांचा जास्त आहार केल्याने आपल्या शरीरातील कॅलरी देखील वाढतात. फळांमध्ये विटामिन, मिनिरल्स, फाइबर आणि अँटीऑक्सीडेंट्स असते. त्यामुळे वजन कमी होत नाही.

टीप : वजन कमी करण्यासाठी ही एक सामान्य माहिती आहे, साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT