Sign of Rat in House  Saam tv
लाईफस्टाईल

Sign of Rat in House : घरात उंदीर असणे शुभ की अशुभ? जाणून घ्या शास्त्र काय सांगते

Sign of Rat in House in marathi : . हिंदू धर्मात उंदराचं खूप महत्व आहे. उंदराला भगवान गणेशाचं वाहन मानलं जातं. याच उंदराचं घरात असणे शूभ की अशूभ आहे? जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Auspicious & Inauspicious Sign of Rat :

घरांमध्ये उंदीर दिसणे साधारण बाब आहे. तुम्हाला कधीतरी घरात उंदीर दिसला असेलच. हिंदू धर्मात उंदराचं खूप महत्व आहे. उंदराला भगवान गणेशाचं वाहन मानलं जातं. याच उंदराचं घरात असणे शूभ की अशूभ आहे? जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

घरात वारंवार उंदीर दिसत असेल तर त्याने घरात बीळ केले असण्याची शक्यता आहे. शकून शास्त्रानुसार, घरात उंदीर दिसणे आणि न दिसणे या दोन्ही बाबतीत माहिती आहे. हिंदू धर्मानुसार उंदराला गणेशाचं वाहन मानलं जातं. तुमच्या घरात कधीतरी अचानक उंदीर दिसत असेल तर त्याला शुभ संकेत मानलं जातं. याचा अर्थ तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुमच्या घरात उंदीर बीळ करून राहत असेल, तर त्यालाही शुभ संकेत मानलं जातं. शकुन शास्त्रानुसार, तुमच्या घरात उंदीर बीळ करून राहत असेल तर तुमचा शत्रू तुमच्याविरोधात षडयंत्र रचत आहे. तुम्ही अशावेळी सावधान राहणे गरजेचे आहे.

तुमच्या घरात एक ते दोन उंदीर दिसत असेल तर साधारण बाब आहे. पण दिवसेंदिवस तुमच्या घरात उंदरांची संख्या वाढत असेल तर अशुभ मानलं जातं. शकुन शास्त्रानुसार, घरात उंदरांची संख्या वाढत असेल तर घरात सूख, शांती आणि समृद्धी राहत नाही. यामुळे घरात दारिद्र्य वाढते.

उंदराला मारल्याने पाप लागतं का?

शकुन शास्त्रानुसार, रात्री उंदारांचा आवाज येत असेल त्याला अशुभ संकेत म्हणतात. याचा अर्थ तुमच्यासमोर मोठं संकंट उभं राहणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे कोणतंही काम करण्यापूर्वी सतर्क राहिलं पाहिजे. घरातील उंदरांना पळविण्यासाठी तुम्ही त्यांना मारू नये. घरातील उंदरांना पळविण्यासाठी घरात जागोजागी फिटकरी ठेवावी.

डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. साम टीव्ही न्यूज याबाबत पुष्टी करत नाही. कोणताही उपाय करण्याआधी संबंधित विषयावरील जाणकारांचा सल्ला घ्यावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

SCROLL FOR NEXT