Mole Astrology Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Mole Astrology Tips: हनुवटीवर तीळ असलेल्या मुली असतात भाग्यवान, जाणून घ्या शरीरावर असलेल्या इतर खुणांचे महत्त्व

Mole Tips: प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ असतोच. ज्याने त्याच भविष्य सांगता येऊ शकतं. शरीरावर असलेल्या खुणा आणि तीळ यांचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mole Astrology Tips:

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ असतोच. ज्याने त्याच भविष्य सांगता येऊ शकतं. शरीरावर असलेल्या खुणा आणि तीळ यांचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व दिसून येते. याशिवाय त्याच्या भविष्याबाबतही अनेक रहस्ये जाणून घेता येतात. तसेच त्या व्यक्तीला आयुष्यात यश मिळेल की नाही, हे देखील याने कळू शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शरीराच्या कोणत्या ठिकाणी तीळ असणे शुभ आणि अशुभ असते. याशिवाय यातून माणसाला आयुष्यात कोणते फायदे मिळतात, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरीराच्या कोणत्या अवयवांवर तीळ असणे शुभ असते?

1. जर तुमच्या पायाच्या तळव्यावर तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, पायाच्या तळव्यावर तीळ असणे शुभ असते. याशिवाय ज्या मुलींच्या पायाच्या तळव्यावर तीळ असतात ते आपल्यासोबत सासरच्या घरी आनंद घेऊन येतात.  (Latest Marathi News)

2. मुलींच्या शरीराच्या उजव्या बाजूला तीळ असणे अशुभ मानले जाते. पण जर शरीराच्या उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूला जास्त तीळ असतील तर त्या महिला खूप भाग्यवान असतात. याशिवाय त्यांना जीवनात अपार यश मिळते.

3. हनुवटीवर तीळ असणे देखील शुभ असते. ज्योतिषस्त्रानुसार, ज्या लोकांच्या ओठांच्या खालच्या भागात तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात. याशिवाय त्यांना आयुष्यात कधीही कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यांना आयुष्यात लवकरच सर्वकाही मिळते. त्याचबरोबर ज्या पुरुषांच्या हनुवटीवर तीळ असतो त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. याशिवाय त्यांच्या कुटुंबात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते.

4. ज्योतिषस्त्रानुसार, मानेवर तीळ असणे शुभ असते. ज्या लोकांच्या मानेवर तीळ असतो ते खूप आयुष्य जगतात. याशिवाय त्यांची विचारशक्तीही तीक्ष्ण असते, त्यामुळे त्यांना जीवनात फार कमी वेळात यश मिळते.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT