Cancer risk saam tv
लाईफस्टाईल

Cancer risk: तुम्ही उंच आहात, तर तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; संशोधकांचा धक्कादायक दावा!

Cancer risk: कॅन्सरबाबत असं एक नवं संशोधन समोर आलं आहे. जगभरात सध्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. यावेळी उंच व्यक्तींना कॅन्सरचा धोका जास्त असतो, असं समोर आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात सध्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. याशिवाय भारतातंही कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, भारतात २०२३ मध्ये या रोगाच्या तब्बल १४ लाख रूग्णांची नोंद करण्यात आली होती. चुकीची लाईफस्टाइल या गंभीर समस्येला कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता कॅन्सरबाबत असं एक नवं संशोधन समोर आलं आहे, ज्यामुळे कॅन्सर आणि व्यक्तीच्या उंचीमध्ये संबंध असल्याचं दिसून आलंय.

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या मते, उंची आणि कॅन्सर होण्याची शक्यता यांच्यामध्ये संबंध असल्याचं दिसून आलं आहे. या संशोधनामध्ये म्हटलंय की, एखाद्या व्यक्तीची उंची जास्त असल्याने तर त्या व्यक्तीला सामान्य उंचीच्या व्यक्तीपेक्षा कोलन, एंडोमेट्रियम, अंडाशय, प्रोस्टेट, किडनी तसंच स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

संशोधनातून काय समोर आलं?

यूके मिलियन वूमेन स्टडीमध्ये वैज्ञानिकांनी १७ मधील १५ कॅन्सरची तपासणी केली. यामध्ये ज्या व्यक्तींची उंची जास्त होती त्यांना कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं समोर आलं होतं. संशोधकांना असंही आढळून आलं की, जास्त उंचीमुळे कॅन्सरता धोका सुमारे 16% वाढला होता. तर सामान्य उंचीच्या म्हणजेच १६५ सेमी उंची असलेल्या प्रत्येक १०,००० महिलांपैकी सुमारे ४५ जणांना कॅन्सर झाला होता.

ज्या स्त्रियांची उंची १७५ सें.मी. त्यापैकी प्रत्येकी 10,000 महिलांपैकी 52 महिलांना कॅन्सर झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकंदरीत जास्त उंची हा कॅन्सरचा धोका आहे, असं या संशोधनातून समोर आलं.

उंचीचा कॅन्सरशी नेमका संबंध कसा?

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडनुसार, उंच व्यक्तीमध्ये जास्त सेल्स असून या सेल्समध्ये उत्परिवर्तन आणि त्यांचं विभाजन होण्याचा धोका जास्त असतो. जर शरीरातील या सेल्स वाढू लागल्या तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. एखाद्या उंच व्यक्तीच्या शरीरात अधिक सेल्स असल्याने त्यांचं विभाजन अधिक होतं आणि त्यामुळे त्यांच्यापैकी एकामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, ४ महिन्यात ₹५०० ने महागला

Jaggery Benefits: पूर्वी बाहेरुन आल्यावर पाहुण्यांना गूळ पाणी का द्यायचे? काय आहेत गूळ पाण्याचे फायदे?

हवेत भिरकावलं, चिमुकल्याला आपटलं; रिक्षाचालकाच्या विकृतीचा कळस

संतप्त गावकऱ्यांचा भोंदूबाबाला चोप, गावकऱ्यांनी कशी घडवली अद्दल? VIDEO

SCROLL FOR NEXT