Fear Of Losing Friendship Saam Tv
लाईफस्टाईल

Fear Of Losing Friendship : तुम्ही देखील तुमच्या मित्राच्या प्रेमात पडलाय? मैत्री गमवण्याची वाटतेय भीती? या गोष्टी लक्षात ठेवा

Losing Friendship : एक मुलगा आणि मुलगी कधीही मित्र होऊ शकत नाहीत. हे खर असण्यापेक्षा यामध्ये सायन्स दडलेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Friendship Losing Fear : एक मुलगा आणि मुलगी कधीही मित्र होऊ शकत नाहीत. हे खर असण्यापेक्षा यामध्ये सायन्स दडलेले आहे आणि याचं कारण म्हणजे, दोन विपरीत गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होणे. अशातच तुम्हाला तुमच्या मित्रावर किंवा मैत्रिणीवर प्रेम जडले असेल आणि तुम्ही त्यांना प्रपोज करण्याचा प्लॅन करत असाल तर, हा लेख तुमच्यासाठी आहे.

जगामधील सर्वात सुंदर नातं म्हणजे मैत्रीचं नातं. बऱ्याचदा असे मानल जाते की तुमचा मित्र (Friendship) तुमचा लाईफ पार्टनर झाला तर सोन्याहून पिवळ असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारची नाती कधीही न तूटण्याचा इशारा देत असतात.

परंतु स्वतःच नशीब आजमावण्याआधी तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे मन जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर प्रेमासोबत (Love) मैत्री देखील तुटू शकते. अशावेळी सरळ पॉईंट वरती येण्याआधी पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलेलं टिप्स जरूर लक्षात ठेवा.

तुम्ही तुमच्या मित्राच्या मनातील इच्छा जाणून घ्या -

जर तुम्हाला तुमच्या मित्रावर किंवा मैत्रिणीवर प्रेम झाले असेल तर, मेंदूचा योग्य वापर करणे अतिशय गरजेचे आहे. भावनांच्या आहारी जाऊन तुम्ही स्वतःच्या इच्छा सांगण्याआधी तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचं मन जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बोलन्याबोलनामध्ये प्रेम आणि रिलेशनच्या बाबतीत त्यांचे मत जाणून घ्या. या आधारावर तुम्ही त्यांना प्रपोज करण्याचे पाऊल उचला.

त्यांना कम्फर्टेबल फील करून द्या -

कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा कम्फर्ट झोन अतिशय महत्वाचा असतो. अशावेळी तुमच्या राणी तुम्हाला असं अनुभव करून दिला की तो तुमच्यासोबत फ्री असतो, तुमच्या सुखदुखात आणि तुम्ही कोणत्याही संकटात असाल तर तो व्यक्ती तुमच्या जवळ येऊ शकतो. तर तुम्ही अर्धी लढाई जिंकले आहात असं समजा.

दुसऱ्यांना सांगून स्वतःची गोष्ट सांगू नका -

तुम्ही ही गोष्ट अमलात आला की, तुमच्या त्याबद्दलचे तुमचे इमोशन फक्त तुम्हीच त्याला सांगा. इतर व्यक्तीमार्फत त्यापर्यंत असे संदेश पोचवू नका. प्रपोजल एक्सेप्ट झाल्यानंतरच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सांगा. सोबतच दुसऱ्या मित्रामार्फत स्वतःचा मेसेज डिलिव्हरी करू नका. असं केल्याने गोष्ट बिघडू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT