Anti Aging Skin Care
Anti Aging Skin Care Saam Tv
लाईफस्टाईल

Anti Aging Face Pack : कमी वयात त्वचेवर सुरकुत्या येताय? हा फेसपॅक ट्राय करुन पाहा

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

बदलेल्या वातावरणाचा आपल्या त्वचेचवर अधिक परिणाम होतो. यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम असतो तो आपल्या जीवनशैलीचा. सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतो तो चेहरा.

वयाच्या ३० व्या वर्षी आपली त्वचा ५० व्या वर्षासारखी दिसू लागली आहे. उन्हाळ्यात (Summer Season) किंवा काही चुकीच्या नियमांमुळे आपला चेहरा खराब दिसू लागतो. जर तुमच्या ही चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या येत असतील तर हे घरगुती फेसपॅक ट्राय करु शकतो.

1. मधाचा फेस पॅक

मधामुळे त्वचेला अनेक प्रकारे फायदा (Benefits) होतो. याचा समावेश फेस पॅकमध्ये केल्याने त्वचेची आद्रर्ता राखता येते. तसेच चेहऱ्याची चमक वाढवता येते. मधामुळे त्वचेवरील डाग कमी करता येतात. दालचिनी आणि मध एकत्र करुन लावल्याने फायदा होतो.

2. पपई फेस पॅक

पपई तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या स्किन केअर (Skin care) रुटीनमध्ये याचा समावेश करुन त्वचा मऊ आणि चमकवू शकतो. यामुळे वृद्धत्वाची चिन्हे कमी करता येतात. पपईमध्ये मध मिसळून लावल्याने फायदा होईल.

3. बदाम आणि दुधाचा फेस पॅक

बदामामध्ये त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे गुणधर्म आहेत. त्वचेच्या रुटीनमध्ये याचा समावेस करुन तुम्ही त्वचेची आद्रर्ता राखू शकता. तसेच चेहऱ्यावर लहान वयात वृद्धत्व दिसायला लागले की, बदाम, दुध आणि मधाचा फेस पॅक लावल्याने फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Side Effects : उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Saam Exclusive : बारावीला १०० टक्के मिळवणाऱ्या तनिषा बोरमणीकरनं कशी केली होती परीक्षेची तयारी? बघा VIDEO फक्त 'साम टीव्ही'वर

Health Tips: एक महिना कांदा खाल्लाच नाही तर काय होईल?

पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका

Pune Police PC Hit And Run Case | दोषींवर कडक कारवाई करणार, पोलीस ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT