Amazon Great Indian Festival Sale 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Great Indian Festival Sale 2023 : सणासुदीच्या काळात अ‍ॅमेझॉनचा मोठा धमाका! फोन आणि लॅपटॉप स्वस्तात, घरगुती वस्तूही मिळतील अर्ध्या किंमतीत

Great Indian Festival Sale 2023 : सणांचा हंगाम आला आहे. या Amazonसारख्या ई-कॉमर्स कंपन्यानीही लोकांसाठी मोठ्या सवलती आणि डीलसह Sale आणण्याची तयारी सुरू केली आहे.

Shraddha Thik

Amazon Sale 2023 :

सणांचा हंगाम आला आहे. या Amazonसारख्या ई-कॉमर्स कंपन्यानीही लोकांसाठी मोठ्या सवलती आणि डीलसह Sale आणण्याची तयारी सुरू केली आहे. या काळात प्रत्येक वेळी, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणते आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणते.

ज्यामध्ये स्मार्टफोन (Smartphone), टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप आणि इतर अनेक वस्तू अर्ध्याहून कमी किंमतीत बंपर डिस्काउंटमध्ये उपलब्ध असतात. Amazon लवकरच आपला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू करणार आहे. याबद्दल जाणून घेऊया...

सध्या Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Festival) सेल 2023 संदर्भात कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, Amazon चा फेस्टिव्हल सेल 10 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो, जो 18 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. ज्यांच्याकडे Amazon प्राइम सबस्क्रिप्शन आहे, ते एक दिवस अगोदर या सेलचा लाभ घेऊ शकतील.

Bank Offers

तुम्ही SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे Amazon Festival Sale मध्ये खरेदी केल्यास, तुम्हाला 10 टक्के झटपट सूट मिळेल. जर तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी सक्रिय केले नसेल, तर ते ताबडतोब करा जेणेकरून तुम्हाला Amazon दिवाळी सेल दरम्यान त्याचा लाभ घेता येईल.

Discount Details 75% पर्यंत

डिस्काउंट Amazon Great Indian Festival Sale मधील अनेक वस्तूंवर उपलब्ध होणार आहे. Amazon Festival Sale मध्ये तुम्ही लॅपटॉप (Laptop), स्मार्टवॉच, हेडफोन्स सारख्या वस्तूंवर 55% पर्यंत सूट मिळवू शकता. यासोबतच तुम्हाला किचन, घरतील वस्तूंवर 70% सूट मिळू शकते.

तसेच फर्निचर आणि गाद्यांवर 80% पर्यंत सूट मिळू शकते. जर फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांवर 50%-80% पर्यंत सूट मिळू शकते. या Amazon सेलमध्ये तुम्ही कपड्यांवर 60% आणि फुटवेअरवर 50% ते 80% पर्यंत सूट मिळवू शकता.

या वस्तूंवर बंपर सवलत. Amazon च्या या सेलमध्ये तुम्हाला टीव्ही आणि उपकरणांवर 75% सूट मिळेल. यासोबतच तुम्हाला वॉशिंग मशिनवर 55% सूट मिळू शकते. त्याच वेळी, अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडलवर 55% पर्यंत सूट मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT