Amazon Freedom Festival Sale 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Freedom Festival Sale 2023 : स्मार्टवॉच खरेदी करताय? 5,000 पेक्षा कमी किंमतीत 'हे' बेस्ट फीचर्स आणि वॉटरपूफ्र पर्याय पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Top Deals On Smartwatch Under Rs 5000 : Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 सुरू झाला आहे. हा Amazon सेल 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. Amazon ग्रेड फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 प्राइम आणि नॉन-प्राइम वापरकर्त्यांसाठी चालू आहे. Amazon च्या या सेलमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर गॅजेट्सवर भरघोस सूट मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डसह सेलमध्ये सूट देखील मिळेल. स्मार्टवॉचवर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

बोट एक्सटेंड

बोट एक्सटेंडला Amazon सेलमध्ये 1,798 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध केले गेले आहे. यात 1.69 इंच LCD डिस्प्ले आहे. याशिवाय, यात स्ट्रेस ट्रॅकिंग, हार्ट रेट ट्रॅकिंग आणि SpO2 सारखी आरोग्य वैशिष्ट्ये आहेत. बोट Xtend 14 स्पोर्ट्स मोड ऑफर (Offer) करते. त्याच्या बॅटरीबाबत 7 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो प्लस

फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो प्लस रु.1,298 मध्ये खरेदी करता येईल. यात 1.83 इंच एचडी डिस्प्लेसह ब्लूटूथ कॉलिंग आहे. याशिवाय यात 100 स्पोर्ट्स मोड आहेत. घड्याळाला IP67 रेटिंग मिळाली आहे.

रेडमी स्मार्ट बँड प्रो

रेडमी स्मार्ट बँड प्रो Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये Rs 1,798 च्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले सपोर्टसह 1.47-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि SpO2 हे फिचर्स हेल्थ फीचर्स (Features) म्हणून उपलब्ध आहेत. घड्याळाला 5ATM ची रेटिंग मिळाली आहे आणि बॅटरीच्या बाबतीत 14 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा केला आहे.

नॉईज कलरफिट पल्स गो बझ

नॉईज कलरफिट पल्स गो बझ रु.1,398 च्या किमतीत खरेदी करता येईल. यासोबतच Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने (Credit Card) पेमेंट केल्यावर 2,200 रुपयांची वेलकम ऑफर देखील मिळू शकते. Noise ColorFit Pulse Go Buzz मध्ये ब्लूटूथ कॉलिंग देखील आहे. यात 1.69 इंच TFT डिस्प्ले आहे.

Amazfit Pop 3S

Amazfit Pop 3S 4,498 रुपयांच्या सेलमध्ये खरेदी करता येईल. यासोबतच 300 रुपयांचा कॅशबॅकही उपलब्ध आहे. यासोबतच 2,200 रुपयांची वेलकम ऑफरही आहे. यात 1.96 इंचाची AMOLED स्क्रीन आहे आणि ब्लूटूथ कॉलिंगलाही सपोर्ट करते. याच्या बॅटरीबाबत 12 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT