Airtel 839 And 869 New Recharge Offer Saam tv
लाईफस्टाईल

Airtel 839, 869 Plan: युजर्सची मज्जा! एकाच रिचार्ज प्लानमध्ये मिळवा OTT अन् डेटा प्लान, ऑफर पाहा

Airtel 839 And 869 New OTT Recharge Offers Details in Marathi: एअरटेलने नुकतेच दोन नवीन प्लान आणले आहेत. ज्याविषयी खूप कमी युजर्सला माहित आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अधिक डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल. जाणून घेऊया ऑफरबद्दल सविस्तर

कोमल दामुद्रे

Airtel OTT Recharge Plan :

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नेहमी सज्ज असते. अशातच एअरटेलने पुन्हा एकदा नवीन रिचार्ज प्लान ऑफर केला आहे. चांगली कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्कसाठी ही कंपनी देशातील दुसरी मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.

एअरटेलने (Airtel) नुकतेच दोन नवीन प्लान आणले आहेत. ज्याविषयी खूप कमी युजर्सला माहित आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अधिक डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल. जाणून घेऊया ऑफरबद्दल (offer) सविस्तर

1. एअरटेलचा ८३९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या लिस्टमध्ये ८३९ रुपयांचा (Price) प्लान आहे. या प्लानमध्ये कंपनी वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता ऑफर करते आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स करता येतील तसेच या प्लानमध्ये वापरकर्त्यांना एकूण 168GB इंटरनेट डेटा ऑफर करते आहे. दिवसाला तुम्हाला २ जीबी डेटा वापरता येईल. यासोबत १०० एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एअरटेल स्ट्रीम प्लेमध्ये १५ पेक्षा जास्त OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. यामुळे तुम्हाला ओटीटीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार नाही.

2. एअरटेलचा ८६९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या लिस्टमध्ये ८६९ रुपयांचा प्लान देखील मिळत आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता देत आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमेटड कॉलिंगसह १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. 5G डेटासाठी तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. या प्लानमध्ये कंपनी युजर्सला दिवसाला १०० एसएमएसची ऑफर देत आहे. यावर तुम्हाला Disney Plus Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी

Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र, ६८०० कोटींची सरकार वसुली होणार?

कोणतेही पुरावे सापडले नाही...; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाची निरीक्षणे काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT